महाराष्ट्रमुंबई 

अरुण गवळीची ‘दगडी चाळ’ होणार इतिहासजमा

म्हाडा उभारणार ४० मजली दोन टॉवर

मुंबई​ :​
पूर्वाश्रमीचा ​अंडरवर्ल्ड डॉन ​आणि नंतर अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेल्या अरुण गवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाणारी भायखळा येथील दगडी चाळ ​आता कात टाकणार आहे. पुढील चार वर्षात दगडी चाळीच्या जागेवर रहिवाशी इमारतींचे 40 मजल्यांचे दोन टॉवर उभे रहाणार आहेत. यामध्ये ​येथील ​प्रत्येक रहिवाशाला 450 चौरस फुटाचे घर देण्यात येणार आहे.

dagadi chawlभायखळा येथील बापूराव जगताप मार्गावर गेल्या ​सव्वाशे वर्षांपासून ​दगडी चाळ ​उभी आहे. येथील 9 इमारती या अरुण गवळी यांच्या मालकीच्या असून एक इमारत इराणी व्यक्तीच्या नावे आहे. या दहा इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव वि​का​सक आणि रहिवाशांनी म्हाडाला सादर केला आहे. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने प्रकल्पाला कार्यादेश दिला ​आहे. या दहा इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया लिव्हस्टोन या वि​का​सकाकडून सुरु करण्यात आली आहे. या इमारती उपकरप्राप्त असल्याने रहिवाशी आणि विकसकाने पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे प्रस्ताव सादर केला आहे​, ​अशी माहिती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. हा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. रहिवाशांची पात्रता निश्चिती झाल्यानंतर काम सुरु करण्यासाठी ना हरकत पत्र देण्यात येईल, असेही घोसाळकर यांनी सांगितले.
​​

दगडी चाळीतील इमारती या सव्वाशे ते शंभर वर्ष जुन्या आहेत. या दहा इमारतीमध्ये 388 रहिवाशी असून त्यांना पुनर्विकास होणाऱ्या इमारतीमध्ये 450 चौरस फूट क्षेत्रफळाचे घर देण्यात येणार आहे. रहिवाशी इमारतीसाठी दोन विंग असलेल्या इमारती उभारण्यात येणार आहेत. तर विक्री घटकाचे सुमारे 50 ते 60 मजल्याचे टॉवरही येथे उभारण्यात येणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: