गोवा 

मगोचे दशरथ महाले यांचा भाजपात प्रवेश

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत तोरसे मतदार संघातून मगो तर्फे दशरथ महाले यांची सून निवडणुकीला उभी राहिली होती , त्या काळात दशरथ महाले यांनी मगो पक्षासाठी काम केले होते .मात्र मगो पक्षाला पराभूत करून भाजपचे उमेदवार सीमा खडपे विजयी ठरल्या होत्या , भाजपची कार्यपद्धतीवर आकर्षित होवून उगवे चे माजी सरपंच तथा बाबू आजगावकर यांचे मागच्या तीन निवडणुकीत त्यांच्या सोबत असलेले दशरथ महाले यांनी १५ रोजी भाजपात प्रवेश केला ,

पेडणे शासकीय विश्रामधाम येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , सरचिटणीस तथा पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर , जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर ,हसापुर सरपंच संतोष मळीक , पंच उदय पालयेकर , आबा तळकटकर ,माजी सरपंच सुर्यकांत तोरस्कर , उदय प्रभूदेसाई आदी उपस्थित होते .

दशरथ महाले यांचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी गळ्यात पुष्पहार घालून स्वागत आणि पक्षात प्रवेश दिला .
कायमस्वरूपी भाजपात :
दशरथ महाले याना पत्रकारांनी छेडले मागच्या निवडणुकीत तुम्ही  आजगावकर यांच्यावर टीका करत होता आता त्याचा जयजयकार कसा करणार असा सवाल उपस्थित केला असता , मागच्या निवडणुकीत काही मतभेद होते ते आता दूर झाले आहेत ,मतदार संघाचा विकास केवळ बाबू आजगावकर करणार आहे ,आणि त्यांची काम करण्याची धमक आम्हाला माहित आहे  बाबू आजगावकर यांचेही भाजपातील शेवटचे पक्षांतर असल्याने आपणही शेवटपर्यंत भाजपात असणार असल्याचे सांगितले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: