गोवा 

‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास करुया’

पेडणे (प्रतिनिधी) :

मांद्रे मतदार संघाचा विकास हा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा गतीने करुया त्यासाठी जनतेने पाठींबा द्यावा . नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधीकडून आपल्याला हवा तसा विकास करुन घ्यायाला हवा , कारण देशात आणि राज्यात जे सरकार आहे ते सरकार जनतेचे सरकार आहे , असे प्रतिपादन आमदार दयानंद सोपटे यांनी तुये येथील श्री भगवती मंदिर परिसरात गोवा पर्यटन विकास महामंडळ तर्फे हायमास बसवण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते .

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा सरपंच सुहास नाईक , पंच किशोर नाईक , गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालिका सुचना अनंत गडेकर , संचालक सुदेश सावंत , हरमल माजी सरपंच अनंत गडेकर , दवास्थान महाजन जयराम नाईक , दामोदर नाईक आदी उपस्थित होते .

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना आम्हाला गावागावाचा सर्वांगीण विकास करायचा आहे . गोवा पर्यटन विकास महामंडळा मार्फत अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विकास स्वदेश दर्शन योजनेंतर्गत शहरातील पर्यटक ग्रामीण भागात कसे वळतील त्यासाठी गावागावातील मंदिर , चर्च , पर्यटन स्थळाचा विकास केला जाणार आहे . त्यासाठी नागरीकानी , पंचायत मंडळांनी विकासाची कामे सुचवण्याचे आवाहन केले .

सरपंच सुहास नाईक यांनी बोलताना आमदार दयानंद सोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात विकास सुरु आहे , सध्या कोरोना काळ असल्याने त्यात थोडी अडचण येते . मंदिर परिसरात हायमास बसवण्याच्या कामाचा शुभारंभ केल्याबद्दल सरपंच नाईक यांनी समाधान व्यक्त केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: