गोवा 

‘कोरोनावर मात करत विकासाची वाट धरूया’

पेडणे ​(प्रतिनिधी) :​
सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यास तुम्ही निवडून दिलेला  लोकप्रतिनिधी समर्थ आहे . मुलभूत गरजा प्रत्येकाच्या दारात पोचवण्यासाठी राज्य सरकार , सरकारातील मंत्री आमदार कार्यरत आहे , आम्हाला आमचे तुमचे जीवन सुरक्षित ठेवून कोरोनावर मात करून विकास करायचा आहे असे प्रतिपादन मांद्रेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेअरमन दयानंद सोपटे यांनी पार्से येथील नाला दुरुस्ती कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते .

मधलावाडा पार्से येथील रमेश कांबळी निवास्थान शेजारील पारंपारिक नाल्याचे बांधकाम शुभारंभ ८ रोजी  करताना पार्से सरपंच प्रगती सोपटे , उपसरपंच अजित मोरजकर , पंच प्रेमनाथ कानोलकर , पंच सदस्या ममता सातर्डेकर आदी उपस्थित होते .एकूण चार चार लाख ९८ हजार खर्च करून काम केले जाणार आहे .

या वेळी आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना कोरोना काळात कामे करताना अडचणी येतात मात्र राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि जलसिंचन खात्याचे मंत्री फिलीप नेरी यांच्या सहकार्यातून हि कामे सुरु आहेत . सध्या १२ कामांचा शुभारंभ केला आहे . काम सुरु असताना नागरिकांनी आपल्याला हवे तसे करून घ्यावे . ठेकेदाराला हवे तसे काम नको तर जनतेला हवी तशी कामे करायला हवी ,असे सांगून मान्सून पूर्व कामाना स्थानिक पंचायतीने प्राधान्य द्यायला हवे असे सोपटे म्हणाले .

सरपंच प्रगती सोपटे यांनी बोलताना आमदार दयानंद सोपटे यांच्या नैतृत्वाखाली मतदार संघात विकासाची कामे जोरात चालू आहे , विकास पंचायत पातळीवरून करताना स्थानिकनागरिक  जमीनदार यांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगितले .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: