गोवा 

‘राज्यात आरोग्य आणिबाणी जाहीर करा’

‘गोंयच्या रापोणकारांचो एकवोट’ने केली मागणी

पणजी :
मच्छीमार समुदायातील प्रत्येक व्यक्ती पॉझिटिव्ह म्हणून घोषित होत असल्याने गोव्यातील कोविड पॉझिटिव्ह होण्याचा दर आणि मृत्यू दर नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल ‘गोंयच्या रापोणकारांचो एकवोट’चे सरचिटणीस ओलेन्सिओ सिमोस यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

‘जीआरई’ ने अशी मागणी केली आहे की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कलम आणीबाणीची स्थिती म्हणून जाहीर करावे, किंवा रोमानिया, झेक प्रजासत्ताक, इथिओपिया, स्पेन, इटली, अमेरिका इत्यादीसारख्या देशांप्रमाणेच ‘आपत्कालीन स्थिती’ जाहीर करावी. मागील वर्षी कोविड लाट थांबविण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती.

आरोग्य सेवा संचालनालय पूर्णपणे कोलमडले आहे. राज्य प्रशासन आणि नेतृत्व साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. सरकारचे दुर्लक्ष, गैरव्यवस्थापन आणि निर्णयाची चूक यामुळे आमच्या गोमंतकीयांना त्याचा फटका बसला आहे. ओलेनसिओ म्हणाले, की कोविडच्या प्रसाराला पूर्णपणे आळा घालण्याची गरज असल्याने आपत्कालीन स्थिती ही काळाची गरज आहे. कारण आपण आपले जवळचे व प्रियजन हरवत चाललो आहोत.

ही खेदाची गोष्ट आहे की कोविड प्रकरणे आणि मृत्यूची संख्या दर भारतात गेल्या वर्षी सर्वाधिक होती. गोवा सरकारने पूर्वसूचना मिळूनही त्वरेने कार्यवाही केली नाही, ते केंद्र सरकारच्या सर्व विनाशकारी प्रकल्पांना मंजुरी देण्यात व्यस्त होते, असे ते म्हणाले. ओलेनसिओ यांनी अशी मागणी केली आहे की राज्यात अधिक कोविड सेंटर बांधून कार्यान्वित करावीत आणि ऑक्सिजन पुरवठाही वाढवणे आवश्यक आहे.

घरातच विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर कडक नजर ठेवणे आवश्यक आहे. कारण बरेच रुग्ण कोविड संबंधित नियमांचे उल्लंघन करतात. रुग्णालयांमधील कोविड रूग्णांचे काळजी वाहणारे नातलगही आजूबाजूला मुक्तपणे फिरत आहेत आणि कोविड परिस्थिती आणखी चिघळवत आहेत. राज्य सरकारने ‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायदा 2000 अंतर्गत सर्व हॉटेल्स ‘कोविड केंद्रां’मध्ये रूपांतरित केली पाहिजेत यामुळे कोविड रूग्णांना उत्तम उपचार मिळतील. आपण मृत्यूचे प्रमाण कमी करू शकू. कारण कोरोनाने आधीच 1937 जणांचा बळी घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: