गोवा 

‘लोकप्रतिनिधी, पंचायत कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करा’

आपचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी केली सरकारकडे मागणी

पणजी : 
सरकारने फ्रन्टलाइन कोरोना योद्धे यांच्या व्याख्येत बदल करून त्यामध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश व्हावा व त्या सर्वांचे प्राधान्य क्रमाने लसीकरण करण्यात यावे.
निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी कोरोना रोखण्याच्या कामकाजात अग्रभागी लढा देत आहे त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे, त्यामुळे त्यांना कोरोना योध्ये घोषित करून त्यांचे प्राध्यान्याने लसीकरण करावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकानुसार, पंचायत कार्यालयांमध्ये तसेच नगरपरिषद कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना फ्रंटलाईन योद्धा म्हणून घोषित करावे. यात सर्व ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, सचिव आणि कार्यालयीन कर्मचारी तसेच ग्राउंड कर्मचारी यांचा समावेश असावा.  तिळवे यांनी विशेषतः स्वच्छताविषयक आणि कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांची दुर्दशा यावर प्रकाश टाकला आहे. सदर कर्मचाऱ्यांना कोणत्याही संरक्षक  (हातमौजे) उपकरणाशिवाय कचरा हाताळवा लागतो त्यामुळे त्यांचे त्वरित लसीकरण करावे. तसेच त्यांच्या वाढणार्‍या या जोखमीमुळे त्यांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी योग्य उपकरणे व प्रशिक्षण देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली.

aap goa
अ‍ॅड. सुरेल तिळवे

‘खलाशांचे करा प्राध्यान्याने लसीकरण’

दरम्यान, आपच्या खलाशी सेलचे नेते कॅप्टन वेंझी व्हिएगास म्हणाले की, समुद्री जहाजावरील कामकाज व भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे आणि त्यामुळे गोव्यातील समुद्री प्रवाशांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. “गोव्यातील खलाशी अनेक दिवस घरीच होते आणि आता समुद्री कामकाज सुरू होण्याची ते उत्सुकतेने वाट पाहत आहे. शिवाय गोवा सरकार त्यांना रो​​जगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देऊ शकत नसल्यामुळे त्यांना पूर्वीच्या नोकऱ्यातूनच रोजगार मिळत आहे, तेव्हा कमीत कमी सरकारने त्यांचे लसीकरण त्वरित करावे,” अशी मागणी कॅप्टन वेंझी यांनी केली.
खलाशी ज्यांच्याकडे CDC, SID, LOI किंवा इतर कोणताही खलाशी असल्याचा पुरावा असेल अशांचे प्राधान्याने लवकरात लवकर लसीकरण करावे, अशी मागणी कॅप्टन वेंझी यांनी केली आणि सरकारने यात उशीर न करता लसीकरणासाठी स्वतंत्र काउंटर स्थापन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: