देश-विदेशगोवा 

‘सरकारच्या नाकर्तेपणानेच दिल्लीत प्राणवायू अभावी बळी’

कॉंग्रेस सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांचा आप-भाजपवर थेट हल्ला 

पणजी:
आप व भाजप सरकारच्या नाकर्तेपणानेच शनिवारी दिल्लीच्या (delhi) बात्रा इस्पितळात उपचार घेत असलेल्या आठ निष्पाप रुग्णांचे प्राणवायुच्या अभावामुळे बळी गेले. भाजप व आप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे लोकांचे प्राण जात आहेत अशी टिका कॉंग्रेस सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ” आत्मनिर्भर भारत” व “मेक इन इंडिया” या केवळ पोकळ घोषणा व जुमला असल्याचे या दुर्देवी घटनेवरुन उघड झाले असुन, आज लोक प्राणवायु उपलब्ध करण्यास सरकार असमर्थ ठरल्यामुळे मरत आहेत हे धक्कादायक आहे.
आजच्या दिल्लीतील ह्या घटनेला स्थानिक आम आदमी पक्षाचे सरकार तसेच केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असुन, त्यांनी आठ निष्पाप कोविड रुग्णांची हत्या केली आहे असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.
लोकांना जगण्याचा अधिकार देणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. पण आज दिल्ली व देशातील इतर भागातील परिस्थिती पाहता, भाजप व आप सरकारने मागील एका वर्षात कोविडची दुसरी लाट रोखण्यासाठी काहिच केले नाही हे स्पष्ट आहे.
आज गोव्यातही भयंकर परिस्थिती असुन, शनिवारी झालेल्या ५४ मृत्युनी धोक्याची घंटा परत एकदा वाजली आहे. लोक संकटात सापडलेले असताना, भाजपचा परिवार सदस्य आम आदमी पक्ष मात्र सरकार विरुद्ध न बोलता पत्रके काढुन सल्ले देण्याचे काम करत आहे असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: