देश-विदेश

‘तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही’

ऑक्सिजनच्या तुटवड्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारलं केंद्राला

नवी दिल्ली :
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरुच आहे. अशावेळी काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतोय. त्याचबरोबर व्हेटिलेटर्सही कमी पडत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi high court) मंगळवारी ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. ‘देशात जी स्थिती आहे. ती पाहून तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही. केंद्राने तर डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, पण आम्ही तसं करु शकत नाही’, अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
उच्च न्यायालयात (Delhi high court) अमिकस क्यूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत अनेक लोकांना ऑक्सिजन मिळत नसल्यानं आपला जीव गमवावा लागत आहे. काही जागांवर ऑक्सिजनचा साठा केला जाऊ शकतो. जेणेकरुन ऐनवेळी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असा सल्लाही अमिकस क्यूरी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला दिला आहे.
यावर महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनची गरज भागत असेल तर महाराष्ट्रातील काही टँकर दिल्लीला पाठवले जाऊ शकतात, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यावर केंद्राने सांगितलं की, आम्ही उच्च न्यायालयासमोर अहवाल सादर करत आहोत. आम्ही या तथ्यापर्यंत जाणार नाही की 700 MT चा पुरवठा केला जावा की ऑक्सिजनचा बाकी कोटा पूर्ण केला जावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!