गोवा 

गांजाप्रकरणी दिल्लीतील एकाला पेडण्यात अटक

पेडणे ​:​

​दिल्ली येथील अर्यामिक सेन या २३ वर्षीय युवकांनी आपल्याकडे गांजा बाळगल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी अटक केली .

पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी माहिती देताना हरमल भागात एक युवक ड्रग्स व्यवहारात सामील असल्याची माहिती मिळाली. ३ रोजी पेडणे पोलिसाना हि माहिती मिळताच रात्री साडेनऊ वाजता पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली. वर्णन केलेला एक युवक पोलिसांच्या नजरेला पडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून १६ हजारांचा गांजा सापडला. अमलीपदार्थ विरोधी कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रफुल गिरी व इतर पोलिसांनी हि कारवाई केली. पोलीस अधीक्षक शोबित सक्षेना पोलीस उपाधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे तपास चालू आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: