गोवा देश-विदेश

‘गोव्यातही व्हावे ‘दिल्ली मॉडेल’चे अनुसरण’

गोवा आपने केली राज्य सरकारकडे मागणी

पणजी :
आम आदमी पार्टी गोवाने काल दिल्लीच्या आप सरकारने जाहीर केलेल्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या उपक्रमांचे स्वागत केले असून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही याच मॉडेलचे अनुसरण करण्याची मागणी केली. गोयंकरांना केवळ कोविड सारखा साथीचा रोग नाही तर त्याचवेळी चक्रीवादळ आणि आर्थिक संकटाचा देखील फटका बसला आहे, असे प्रतिपादन राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केले. सावंत यांनी तातडीने सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची वेळ आता आली आहे, असे म्हांबरे म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोविड-19 मुळे ज्या कुटूंबातील एखादा सदस्य गमावला असेल त्या कुटुंबासाठी जाहीर 50,000 ₹ सानुग्रह रक्कम जाहीर केली. त्या भूमिकेचा संदर्भ देताना म्हांबरे म्हणाले की, “जगातील कोणत्याही देशाने किंवा भारतातील राज्याविषयी माहिती नाहीत की, त्यांनी नैसर्गिक आपत्ती अर्थात साथीच्या आजारात आपला जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला कोणी नुकसान भरपाईची घोषणा केली. केजरीवालांनी मात्र केली. हे विशेष आहे”

म्हांबरे यांनी सांगितले की, कोरोनामुळे कमावती व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाला दरमहा २५०० रुपये आर्थिक मदत, तसेच कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दरमहा २,५०० रुपये देण्यासह वयाच्या २५ वर्षापर्यंत त्यांच्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाचा खर्चही केजरीवाल सरकार उचलणार आहे. गेल्या आठवड्यात केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता म्हणून या योजनांची घोषणा केली व याचे स्वागत करताना म्हांबरे म्हणाले की, याशिवाय यांना एकरकमी सानुग्रह रक्कम देखील दिली जाणार आहे.

आप सरकारच्या मोफत रेशन देण्याच्या घोषणेवर प्रकाश टाकताना म्हांबरे म्हणाले की, “दिल्लीमध्ये ७२ लाख लोकांजवळ रेशन कार्ड आहे. त्यांना या महिन्यापासून प्रत्येकी पाच किलो या प्रमाणात एकूण १० किलो मोफत रेशन दिले जाईल. विशेष म्हणजे, ज्या गरीब कुटुंबाकडे रेशन कार्ड नसेल, त्यांनाही कोणत्याही कागदपत्राशिवाय मोफत रेशन दिले जाईल.” तसेच  म्हांबरे म्हणाले की, ” या नोंदणीकृत लाभार्थ्यांना फक्त गरीब असल्याचे जाहीर करणे आवश्यक आहे, त्यांना मोफत रेशन मिळण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही”

अशाप्रकारचा दिलासा गोव्यातील जनतेला देखील मिळाला पाहिजे, असे म्हणताना म्हांबरे यांनी गोवा सरकारकडे पुन्हा मागणी केली की, “लॉकडाऊनमध्ये नुकसान झालेल्या पीडित ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना देखील 5000₹ इतकी दिलासा रक्कम देण्यात यावी.”

goa aapम्हांबरे यांनी आप सरकारचे कौतुक करताना म्हटले की, केजरीवाल सरकारने फरक्त आर्थिकदृष्ट्याच जनतेला दिलासाच दिला नाही तर सोबतच लोकांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नोकरशाहीच्या लाल-फितीच्या कारभारापासून दूर ठेवून यात यात सुलभता आणली. एकीकडे केजरीवाल सरकारचे लोकांसाठीचे शासन तर दुसरीकडे गोवा सरकारचे लाल-फितीत अडकलेले नोकरशाही शासन हा दोघांच्या कार्यक्षमतेतील मोठा फरक असल्याचे सांगताना म्हांबरे यांनी लक्ष वेधले की,” काल  मुख्यमंत्री सावंत त्यांच्या भागात कोविड केअर सेंटर स्थापन करण्यासाठी वैयक्तिक व संस्थांकडून मदतीची मागणी केली असता त्यांनी त्यांना कोविड केंद्राकरीता जिल्हाधिकाऱ्यांकडे जा आणि परवानगीसाठी अर्ज करा” असे म्हटले.

दिल्ली राज्यसरकारच्या सर्व दिलासा देणाऱ्या योजनांचे स्वागत करताना म्हांबरे म्हणाले की,”दिल्लीत  हे शक्य झाले कारण फक्त आणि फक्त अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारमुक्त कारभारामुळे आणि साफ नियतीमुळे! त्यांनी सर्व क्षेत्रात करदात्यांचे पैसे वाचविले. आणि आता त्याचा सुयोग्य वापर करत आहे.”  गोवा हे देशातील दरडोई कर देण्यात सर्वात मोठे राज्य असल्याचे निदर्शनास आणून म्हांब्रे यांनी अशी मागणी केली की, केजरीवाल यांच्याप्रमाणेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जेणेकरून संकटाच्या काळी सरकार भक्कमपणे गोव्याच्या जनतेसोबत उभी राहील.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: