देश-विदेश

‘आता लष्करानेच मदत करावी…’

नवी दिल्ली​ :​
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातला आहे. कुठे ऑक्सिजन तर कुठे बेड मिळण्यासाठी नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. या सर्व परिस्थितीचा सर्वात जास्त फटका या दिल्लीला बसला आहे. दिल्लीत सध्या कोरोनाची चौथी लाट आली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळतोय. अशावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाई लढण्यासाठी आता केंद्र सरकारकडे लष्कराच्या मदतीची मागणी केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना त्याबाबत एक पत्र लिहिले आहे.
​मनीष सिसोदिया यांनी राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात ऑक्सिजन आणि रुग्णालय उभारण्याची मागणी केली. ‘राजधानी  दिल्लीसाठी शक्य होईल तेवढे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले जावेत. त्याचबरोबर DRDO मध्ये ज्या प्रमाणे एका रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार अजून काही रुग्णालयांची उभारणी करण्यात यावी’, अशी मागणी सिसोदिया यांनी पत्राद्वारे राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आणि संबंधित मुद्द्यांवर सोमवारी उच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कराची मदत मिळावी यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले आहे. delhi

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!