देश-विदेश

ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्राला ‘सर्वोच्च’ आदेश

नवी दिल्ली :
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ऑक्सिजन (Oxygen) पुरवठ्याबाबत चांगलेच सुनावले व ठामपणे सांगितले की, आदेशाचा आढावा घेईपर्यंत किंवा सुधारित आदेश पारित होईपर्यंत दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन दिल्लीला द्यावाच लागेल. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला आदेश दिल्यानंतर सुद्धा केंद्र सरकार 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करत नव्हते. दिल्ली सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार विरोधात तक्रार केल्यानंतर न्यायालयाने आज केंद्रावर ताशेरे ओढले ओढले होते.
या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने काल केंद्र सरकारला सांगितले की, कोविड रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिल्लीला दररोज किमान 700 टन ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे. “जर यात काहीही लपविले जात नसेल तर, केंद्राकडून ऑक्सिजनचे (Oxygen) वाटप व वितरण पारदर्शकपणे कसे केले जाते हे देशासमोर येऊ द्या,” असेही सुप्रीम कोर्ट म्हणाले.
याप्रकरणी  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की,” जर केंद्राकडून दररोज किमान 700 टन ऑक्सिजन पुरवठा केला गेला तर आमचे प्रशासन ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू होऊ देणार नाही. ”
“जर आम्हाला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला. तर आम्ही दिल्लीमध्ये 9,000 ते 9,500 बेड तयार करू. आम्ही अधिकाधीक ऑक्सिजन बेड देखील तयार करु. पुरवठा योग्य झाल्यास मी आपल्याला खात्री देतो की,आम्ही  दिल्लीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कुणाचाही मृत्यू होऊ देणार नाही” असे  केजरीवाल म्हणाले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: