गोवा 

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी

पणजी :
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सुमारे ४०० कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगुन याला जबाबदार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या विरूद्ध आगशी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करुन बारा दिवस झाल्यानंतरही पोलिसांनी एफआयआर दाखल न केल्यामुळे कॉंग्रेस पक्षाने आज उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे परत एकदा तक्रार दाखल करुन कलम १५४ (३) खाली गुन्हा नोंद करण्याची मागणी केल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दुष्ट हेतुनेच गोमेकॉत ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता निर्माण केल्याचा आरोप करुन, भाजप सरकारला लोकांच्या जीवाचे काहीच पडलेले नाही असे गिरीश चोडणकर म्हणाले.

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यास आरोग्यमंत्र्यांनी मुद्दामहून चालढकल केल्याचे सांगुन, त्यांच्या बेजबाबदारपणामुळेच अनेकांचे गुदमरून प्राण गेले असे गिरीश चोडणकर म्हणाले. गोव्यात आवश्यक ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध असुनही केवळ आपल्या फायद्यासाठी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी इतर पुरवठादारांकडुन प्राणवायु घेण्यास चालढकल केली. कॉंग्रेस पक्ष ह्या एकंदर घोटाळ्याच्या मुळाशी जावुन सरकारच्या हलगर्जीपणामुळे मरण पावलेल्यांच्या कुटूंबियांना न्याय मिळवुन देणार आहे.

congress
गिरीश चोडणकर

आम्ही आयपिसी ॲक्टच्या कलम ३०२, ३०४, ३३७, ३३८ व कलम ३४ च्याखाली गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. आम्ही गरज पडल्यास हे प्रकरण न्यायालयातही नेणार असल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

कॉंग्रेस पक्षाने १६ मे २०२१ रोजी आगशी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करुन पोलिसांना त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, भाजपच्या दबावामुळे पोलिसांनी पुढील कारवाई करण्याचे टाळले .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: