सातारा 

‘अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याशिवाय ‘त्यांनी’ आजवर काय केले?’

उपसभापती अरविंद जाधव यांची सचिन मोहिते यांच्यावर थेट टीका 

सातारा (महेश पवार) :

कोरोना महामारीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काय केलं, हे अख्या जिल्ह्याला माहिती आहे. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्याच पक्षाचे पदाधिकारी असलेल्या सचिन मोहिते यांनी ठेकेदारांसोबत बैठका आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याशिवाय आजवर काय केलं आहे, असा सवाल करतानाच आपण कोण, आपली पात्रता काय आणि आपण बोलतो काय याचा विचार मोहिते यांनी करावा. हे म्हणजे वरातीमागून आलेलं घोडं म्हणावं लागेल, अशी टीका पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव यांनी केली आहे.

मागच्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली आता दुसरी लाट सुरु आहे. पहिल्या लाटेपासून कोरोना महामारीत लोकांसाठी कोण झटतंय हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे. आता कोरोनाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लोकांनी आपल्यालाही ओळखावं यासाठी निर्जंतुकीकरणाची नौटंकी मोहिते यांनी सुरु केली. सध्या कोरोनाची दुसरी लाट असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून उपाययोजना होणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीत ब्लॅकमेलिंग, निवडणुकीत तोडपाणी करणाऱ्या मोहिते याना गेले वर्षभरात कोरोना दिसला नाही. आता दुसरी लाट सुरु असून आपले काळे धंदे लपवण्यासाठी पांढरी कपडे घालून औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरण करण्याचा दिखावा मोहिते यांचा सुरु आहे.

राज्यात सरकार तुमचे आहे. तुमचे मुख्यमंत्री आहेत मग कोरोना प्रतिबंधासाठी तुम्ही आजवर काय काय केलं? केवळ फोटोसेशन करण्यासाठी लोकांचा पुळका आलेल्या मोहिते याना सातारा तालुक्यात गावे किती आहेत हे तरी माहिती आहे का? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असे प्रकार करून तुमचे काळे धंदे लपले जाणार नाहीत, असे जाधव यांनी म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: