गोवा 

आमदार दयानंद सोपटे यांच्याकडून विकासकामांची पाहणी 

पेडणे ( प्रतिनिधी )
मंजूर करून घेतलेली विकास कामे कशी सुरु आहेत, त्यांचा दर्जा योग्य तो आहे कि नाही या आणि इतर बाबींची पाहणी मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी नुकतीच केली. आपल्या कारकिर्दीत ज्या ज्या कामांचा शीला न्यास झाला त्या कामाचा पाठपुरावा ,दर्जा कसा राखला जातो यासाठी अचानक भेटी देऊन पाहणी करण्यास झपाटा लावला आहे.
मोरजी खिंड शापोरा नदी किनारी दीड कोटी रुपये खर्च करून महत्वाच्या संरक्षण भीतीच्या बांधकामाची 26 रोजी अचानक पाहणी केली. कामाचा दर्जा व काम कसे सुरू आहे  त्याची पाहणी केली. आमदार दयानंद सोपटे यांनी पूर्ण बांधकामाची स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाहणी केली कामाचा दर्जा यावरही त्यांनी समाधान व्यक्त केले .
मोरजी पंचायत क्षेत्रातील खिंड परिसरातील भाटीरवाडा या शापोरा नदीकिनारी स्थानिकांची घरे आहेत. पावसाळ्यात दरवर्षी या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण होत होती. स्थानिक लोकाना पावसाळ्यात जीव मुठीत घेवून आपत्कालीन यंत्रणेच्या संपर्कात राहून पावसाळी दिवस घालवावे लागायचे पूरग्रस्त स्थिती निर्माण झाल्यानंतर या भागाचा संपर्क गावाशी तुटायचा ,त्याकाळात स्थानिक पंचायत पूरग्रस्त भागात मदतीसाठी धावून जायचे .

या भागात संरक्षण भीत बांधून सुरक्षा द्यावी अशी मागणी कित्येक वर्षापासून होती परत याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याच परिसरात खिंड परिसराचे एक आकर्षित पर्यटन स्थळ केल्यानंतर बाजूला जी घरे आहेत त्याना संरक्षण भिंत नसल्याने सौंदर्यीकरणाला बाधा येत असे . २०१७ साली तत्कालीन जलसिंचनमंत्री विनोद पालयेकर यांनी आमदार दयानंद सोपटे यांच्या उपस्थितीत या परिसराची पाहणी केली होती , लगेच संरक्षण भिंत उभारण्याचे आश्वासन विनोद पालयेकर यांनी त्यानंतर तेम्बवाडा येथे आलेल्या कार्यक्रमात दिले होते ,आता ते मंत्री नसल्याने साडे तीन वर्षाचा काळ लोटला आणि मागच्या आमदार दयानंद सोपटे यांच्या सहकार्याने आणि सतत पाठपुरावा केल्यामुळे प्रारकापाच्या कामाचा शुभारंभ झाला होता लवरकर, हि संरक्षण  भिंत पूर्ण झाल्यानंतर आणखी खिंड परिसरातील सौंदर्यीकरणात भर पडणार आहे .

या कामामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करताना संरक्षण भिंत लवकर पूर्ण करावी अशी मागणी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: