सातारा 

धावलीकरांच्या डोक्यावर ‘मरणाचा दगड’

'दगड हटवा आणि आम्हाला वाचवा' : ग्रामस्थांचे प्रशासनाकडे साकडे

सातारा (महेश पवार) :

तालुक्यातील धावली गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले 100कुटुबांचे छोटेसे गाव गावची लोकसंख्या जवळपास सहाशे . सातारा शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेले डोंगर कड्यावर वसलेले गाव. पहिल्याच पावसात लॅन्ड स्लाईड होऊन पावसाच्या पाण्यात रस्ता वाहून गेला. सोबत पिण्याच्या पाण्याच्या पाईप गेल्या आणि आता या गावांच्या डोक्यावर मरण येऊन ठेपलं आहे. गावच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरावर भलामोठा दगड एका झाडाला अडकून राहिला आहे. मोठा पाऊस आला तर होत्याच नव्हते होण्याची शक्यता आहे. गावातील लोक जीव मुठीत धरून राहत आहेत. प्रशासनाला कळवून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे , म्हणून धावलीकर म्हणतायत आमच्या डोक्यावर असलेला दगड हटवा आणि आम्हाला वाचवा,म्हणत धावलीकरांचे प्रशासनाकडे साकडे घातले आहे.

या गावांतील नागरिक म्हणतात आमदार ,खासदार, जिल्हा परिषद सदस्य सोडा साधा पंचायत समिती सदस्य निवडून गेले की पुन्हा फिरकतसुद्धा नाही. अनेक दिवसांपासून विनवण्या करतो पण इकडे कोण फिरकत सुद्धा नाही.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन गावातील नागरिकांना लवकरात लवकर प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावू आणि या लोकांचें जीव वाचवू जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल व होणा-या परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा मोहिते यांनी दिला.

आम्ही गेली चार वर्षे झाली गावच्यावर आलेल्या दगडी रस्ता यासंदर्भात आम्ही तक्रार केली परंतु शासनाने फक्त पंचनामे केले बाकी काही केलंच नाही. या पावसामुळे दरडी कोसळत आहेत पहिल्याच पावसाने रस्ता वाहून जमीन खचली आहे यामुळे शासनाने सांगावं आम्ही जगावं की मरावं. आमची दखल घ्यावी आणि आम्हाला वाचवावे ही आमची शासनाला विनंती.
– राम जाधव, ग्रामपंचायत सदस्य धावली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: