गोवा 

मडकईतील नुकसानग्रस्तांना ढवळीकरांचा दिलासा 

फोंडा :
‘तोकते’ वादळामुळे राज्यभरात बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले आहे. मडकई मतदारसंघातदेखील विविध ठिकाणी या वादळामुळे नागरिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून ठिकठिकाणी जुनी घरे पडली आहेत. या घरांची पाहणी स्थानिक आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली.
वादळामध्ये झाडे पडून मडकई मतदारससंघात कित्येक घरांच्या भिंती पडल्या आहेत. त्याचप्रमाणे घराची कौले, छप्पर पडल्याने पावसाचे पाणी घरात आल्याने बरेच नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची पाहणी सुदिन ढवळीकर यांनी केली असून, नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन देत दिलासा दिला आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: