क्रीडा-अर्थमत

पोलीस भरतीसाठी ‘ध्रुव स्पोर्ट्स क्लब’चे प्रशिक्षण शिबीर 

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
पोलिस भरती होण्यास इच्छुक असलेल्या पेडणे तालुक्यातील युवक युवतींना पार्से येथील ध्रुव आणि स्ट्राँग मॅन  स्पोर्ट्स तर्फे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तूये येथील सुरेश रैना मैदान तसेच समुद्र किनाऱ्यावर घेण्यात येणाऱ्या या सराव शिबिरात या क्षेत्रातील तज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे या शिबिराला पेडणे तालुक्यातील युवक युवतींकडून उत्स्फर्त प्रतिसाद लाभला आहे.

या शिबिर आयोजनाबाबत ध्रुव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष दीपक कलगुटकर म्हणाले, पेडणे तालुक्यातील युवक युवतीं मध्ये पोलीस खात्यात भरती होण्याची. उपजत क्षमता असते मात्र त्यांना योग्य. मार्गदर्शन न लाभल्याने पोलीस भरतीतील शारीरिक चाचणी उत्तीर्ण होता येत नाही परिणामी पात्रता असूनही अनेकांना पोलीस भरतीच्या संधीपासून दूर राहावे लागले ही समस्या ध्यानात घेवून ध्रुव स्पोर्ट्स क्लब ने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. १६ जून पर्यंत हे सराव शिबिर चालू राहील असे त्यांनी सांगितले. अजूनही हा शिबिरात ज्यांना सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी ध्रुव स्पोर्ट्स क्लब च्या पदाधिकारी किंवा माझ्याशी संपर्क साधावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: