क्रीडा-अर्थमत

‘हि’ संस्था करणार २० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण 

पणजी :
डिआजिओ इंडियाने रेझिंग द बार उपक्रमातील नोंदणीकृत एफ अॅण्ड बी व्यवसाय भागीदांराच्या लसीकरणासाठी नॅशनल रेस्तराँ असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय)सोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून डिआजिओ इंडिया या क्षेत्रातील 20,000 कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस पुरवून त्यांना साह्य करणार आहे.
सतत होणारे लॉकडाऊन, त्यातून घटता महसूल यामुळे एफ अॅण्ड बी क्षेत्रावर मागील वर्षभरात बराच परिणाम झाला. याचा फटका व्यवसाय तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही बसला. आता शहरे पुन्हा सुरू होत असताना कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि हित अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत भारतात मद्य पुरवणाऱ्या बार, पब्स आणि रेस्तराँना पुन्हा व्यवसाय सुरू करताना डिआजिओ इंडिया साह्य करत आहे.

जून 2021 पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रेझिंग द बार उपक्रमात नोंदणी केलेल्या 1500 आऊटलेट्समधील कर्मचाऱ्यांना एनआरएआयने भागीदारी केलेल्या दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, मुंबई, पुणे आणि गोव्यातील निवडक हॉस्पिटलमध्ये लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना डिआजिओ इंडियाच्या (उपाध्यक्ष लक्झ्युरी कमर्शिअल, की अकाऊंट्स इंडिया अॅण्ड साऊथ एशिया) श्वेता जैन म्हणाल्या, “जागतिक महासंकटाच्या काळात रेझिंग द बार आणि वर्ल्ड क्लास अशा उपक्रमांच्या माध्यमातून बार आणि हॉस्पिटॅलिटी समुदारांना पाठबळ देण्यात डिआजिओ इंडिया आघाडीवर आहे. या क्षेत्राला पुन्हा झळाळी मिळणे अर्थव्यवस्थेसाठी आणि शहरांमधील सांस्कृतिक परिसंस्थेसाठी महत्त्वाचे आहे. भारतातील एफ अॅण्ड बी क्षेत्राने पुन्हा काम सुरू केले आहे. कर्मचारी आणि ग्राहकांना आवडणाऱ्या जागी पुन्हा परतताना आत्मविश्वास वाटावा यासाठी विकसित सुरक्षा उपाययोजना पुरवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

जून २०२० मध्ये सुरू झालेला ‘रेझिंग द बार’ हा उपक्रम 75 कोटी रुपये मुल्याचा रिव्हायव्हल अॅण्ड रिकव्हरी उपक्रम आहे. यात पब्स, बार आणि रेस्तराँना पाठबळ देऊन संकटाच्या काळातून ग्राहकांचे पुन्हा स्वागत करण्यास व्यवसायांना साह्य केले जाते. या उपक्रमाचा भाग म्हणून डिआजिओ इंडिया आणि एनआरएआय आता सर्व रेस्तराँ कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलून या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी एफ अॅण्ड बी क्षेत्राला साह्य करत आहेत.

या बद्दल इंडिगो हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आणि एनआरएआयचे अध्यक्ष अनुराग कट्रीआर म्हणाले, “या आव्हानात्मक काळात डिआजिओ इंडियाने आमच्या उद्योगक्षेत्राबद्दल दाखवलेल्या या विचारपूर्वक सहानुभूतीबद्दल मी मनापासून आभारी आहे. महासंकटाशी लढण्यासाठी उद्योगक्षेत्र आणि त्यांचे माध्यम भागीदार कसे एकत्र येऊ शकतात याचे हे फार सुंदर उदाहरण आहे. या उपक्रमामुळे एफ अॅण्ड बी समुदाय आणि डिआजिओ इंडियामधील बंध अधिक दृढ होतील आणि एनआरएआय लसीकरण मोहिमेमुळे आमच्या सदस्य रेस्तराँमधील कर्मचारी लगेच कामावर रुजू होत आमच्या पाहुण्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करतील, याची खातरजमा होईल. डिआजिओ इंडियाच्या या प्रयत्नांचे खरंच कौतुक वाटते आणि मला प्रामाणिकपणे असे वाटते की एफ अॅण्ड बी परिसंस्थेतील इतर महत्त्वाचे भागधारकही या पावलांवर पुढे चालतील.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: