गोवा 

‘मुख्यमंत्री, लॉकडाऊन शब्द का उच्चारू शकले नाहीत?’

मडगाव :
लोक आज लॉकडाऊनची (Goa lokdown) मागणी करीत असताना, लॉकडाऊन हा शब्द उच्चारण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांना का झाली नाही? केवळ कर्फ्यू लावुन चालणार नसुन, कडक निर्बंध पाळल्याशिवाय परिस्थिती आटोक्यात येणार नाही. अशा स्पष्ट शब्दात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
Goa lokdownगोव्यात कोविडची परिस्थिती भयानक झालेली आहे. कोविड इस्पितळात ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या तक्रारीचे अनेक फोन आम्हाला येत आहेत. रुग्ण गुदमरत आहेत मात्र सरकार बेफिकीर आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्या सर्वपक्षिय शिष्टमंडळाकडुन गोव्यातील ऑक्सिजन पुरवठा सुविधेची व एकंदर व्यवस्थापनाची पाहणी करावी व सत्य परिस्थिती लोकांसमोर ठेवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यु झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी भाजप सरकारवर राहिल हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे. इस्पितळात ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक प्रमाणात होत नाही व रुग्णांना तो बरोबर मिळत नाही अशा वाढत्या तक्रारी येत आहेत. लोकांना ऑक्सिजनचे सिलींडर मिळत नाहीत. सरकारची सर्व यंत्रणा कोसळली आहे.
सरकारने सर्वपक्षिय शिष्टमंडळाला सगळ्या सुविधांची पाहणी करण्याची हिम्मत दाखवावी असे आव्हान दिगंबर कामत यांनी दिले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: