गोवा देश-विदेश

‘का झाले दिगंबर कामत यांचे ट्विटर अकाउंट बंद?’

पणजी (प्रतिनिधी) :

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. राज्यातील आणि देशातील विविध घटनाक्रमांवर ते सातत्याने व्यक्त होत असतात. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सदेखील आहेत. अशावेळी कालपासून त्यांचे ट्विटर अकाउंट मात्र ट्विटरकडून अचानक बंद करण्यात आले आहे. आपण राज्यातील दलित, बहुजनांबद्दल आणि गोव्याच्या हिताबद्दल सातत्याने लिहीत असल्यामुळेच भाजप सरकारने हि कृती केली असल्याचा आरोप कामत यांनी केला आहे.

कामत यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहीत आपल्या ट्विटर अकाउंटवर केलेल्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले आहे, माझे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका नऊ वर्षीय दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल लिहीत, तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन सहानुभूती व्यक्त केली. या संवेदनशील घटनेला मी पाठिंबा दर्शवल्यानंतर माझे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांचेदेखील ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले.

या देशात दलित, बहुजनांबद्दल बोलणे आणि गोव्याची ओळख कायम राखण्यासाठी प्रयत्नरत राहणे हा भाजप सरकारच्या दृष्टीने गुन्हा झाला आहे.
आज  गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी शपथ घेतो कि, गोव्यासाठी, गोयन्कारासाठी आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी मी नेहमीच बोलत राहीन.’

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: