गोवा देश-विदेश

देश ‘मृतात्मा निर्भर’ व गोवा ‘कोविडपूर्ण’

दिगंबर कामत यांचा केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघात

मडगाव :
आज संपूर्ण देश भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचे परिणाम जनता भोगत आहे. आरोग्यसुविधा व आरोग्यसेवा निर्माण करण्यास अपयशी ठरलेल्या सरकारमुळे निष्पाप लोकांचे प्राण जात आहेत. गोव्याला ‘कोविडपूर्ण’ केल्यानंतर, असंवेदनशील भाजप सरकार स्वयंपूर्ण गोवाचे कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा करते. देशात कोविड (covid19) मृतांचा वाढता आकडा बघितल्यास केंद्रातील भाजप सरकारने देशाला “मृतात्मा निर्भर” बनविले असेच म्हणावे लागेल अशी बोचरी आणि घणाघाती टिका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
आज सगळीकडे प्राणवायू, औषधे, खाटांची याचना करणारे आवाज ऐकू येत आहेत. लोक हतबल होऊन आपल्या नातलगांचे प्राण वाचविण्यासाठी मदत मागत आहेत. मला राज्यभरातून कोविड रुग्णांसाठी मदत मागणारे फोन येत आहे. दुर्देवाने भाजप सरकार दिशाहीन, असंवेदनशील व बेजबाबदारपणे वागत आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
सरकारने इतर सर्व कामे बाजूला ठेवून केवळ लोकांचे जीव वाचविण्यासाठी लक्ष केंद्रित करावे. सर्व वायफळ खर्च बंद करुन कोविड लसी त्वरित मिळवीण्यासाठी सरकारने आपली सर्व शक्ती वापरावी असा सल्ला देतानाच भाजप सरकारने आपला अहंकार बाजूला सारुन लोकांचे प्राण वाचविण्यासाठी आता सर्व सबंधिताना विश्वासात घ्यावे व या महाभयंकर  संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना तयार करावी अशी मागणीही कामत यांनी केली आहे.
COVID vaccineपंतप्रधान नरेंद्र मोदीनी प्रत्यक्षात कृती न करता केवळ भाषणबाजी केल्याने देश आज कोविडच्या जबड्यात सापडला आहे हे जगाला कळले आहे. आपणाला आज प्राणवायुसाठी सुद्धा इतर देशांवर अवलंबुन रहावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचा बोजवारा उडाल्याचे उघड झाले आहे असा दावा दिगंबर कामत यांनी केला.
गोव्यातील भाजप सरकार आपल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करेल अशी आशा मी बाळगतो. कोविड हाताळणी व व्यवस्थापन सुधारण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. गोव्यात आज प्रशासन व प्रणाली अस्तित्वातच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गोमंतकीयांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. सर्वांना या संकटापासुन दूर ठेवण्याची मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: