गोवा देश-विदेश

‘जनतेच्या जीवापेक्षा सरकारचे स्मृतिस्थळांना प्राधान्य’

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची राज्य आणि केंद्रावर थेट टीका 

मडगाव :
केंद्र सरकारच्या सेंट्रल अप्रेजल समिती ऑफ इंफ्रा-२ प्रोजेक्ट ने सॅंट्रल विस्ता प्रकल्पा अतर्गत येणाऱ्या पंतप्रधानांच्या नविन निवासस्थानासह दहा बांधकामांना मान्यता दिल्याने, केद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची प्राथमिकता ही निवासस्थाने, स्मृतीस्थळे व स्मारके बांधण्याची असुन, इस्पितळे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, व्हेक्सिन तसेच औषधे यांच्या बाबतीत सरकारचा प्राधान्यक्रम वेगळा असल्याचे उघड झाल्याची टिका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
गोव्यातील भाजप सरकार केंद्र सरकारचीच रि ओढत असुन, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ कार्यांवित करण्यास सरकारने आठ वर्षे लावली. आज गोव्यात एक खासगी इस्पितळ कोविड लसी आणुन लसीकरण मोहिम राबविते, पण सरकारला लसी मिळवीणे शक्य झालेले नाही यावरुन सरकारचे अपयश दिसते. गोव्यात स्मृतीस्थळे बांधायला सरकारकडे दहा कोटी निधी आहे, परंतु समाज कल्याण खात्यातर्फे  देण्यात येणाऱ्या गृह आधार, विधवा, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग, खलाशी यांचे मासीक पेंशनचे पैसे सरकार सात-आठ महिने देत नाही हे दुर्देवी आहे.
आज संपुर्ण देश कोविड महामारीचा सामना करत आहे. इस्पितळात रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नाहीत, ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय, औषधे व लसी उपलब्ध नाहीत अशा परिस्थितीत बेजबाबदार भाजप सरकार दिल्लीचा सुमारे २० हजार कोटी खर्चाचा “सॅंट्रल विस्ता” प्रकल्प हा जीवनावश्यक सेवा म्हणुन जाहिर करते हे धक्कादायक आहे. आता भाजप सरकारने प्रधानमंत्र्यांचे नविन निवासस्थान डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणार असल्याची घोषणा केल्याने ऐन कोविड संकटात दिल्लीत लॉकडाऊन असतानाही सदर प्रकल्पाचे काम चालुच राहणार हे स्पष्ट आहे. सदर प्रकल्पाच्या ह्या टप्प्याचा अंदाजीत खर्च सुमारे १३४५० कोटी रुपये असल्याचे सरकारनेच सांगीतले आहे.
भाजप सरकारकडे सर्व भारतीयांना मोफत कोविड लस देण्यासाठी निधी नाही. मोदी सरकारच्या बेजबाबदार कोविड व्यवस्थापनामुळे आज हजारो लोकांचे प्राण जात आहेत. कोविडची दुसरी लाट येणार हे माहित असुनही आवश्यक आरोग्यसुविधा निर्माण करण्यास मोदी सरकारला सपशेल अपयश आल्याने देशात हाहाकार माजला आहे अशे दिगंबर कामत म्हणाले.
COVID vaccineयापुर्वी कॉंग्रेस सरकारांनी लोकहिताचे प्रकल्प उभे केले. माजी प्रधानमंत्री पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतुन नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलोजी, भाभा अणुसंधान केंद्र, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मॅडिकल सायंस असे अनेक प्रकल्प उभे राहिले जे आजच्या संकटकाळात महत्वाची भूमिका बजावित आहेत. सन २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारचे धोरण केवळ पुतळे, स्मारके व स्मृतीस्थळे उभारणे व उत्सव साजरे करणे एवढेच मर्यादित राहिले आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
आज केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेत राहण्याचा अधिकार गमावला आहे. लोकांना इस्पितळात जागा मिळत नसल्याने रुग्णांचा रस्त्यांवरच जीव जात आहे. आरोग्यसेवा देणारे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी हे प्रचंड तणावाखाली आहेत. पेशंट ते डॉक्टर, विद्यार्थी ते शिक्षक असे सगळेचजण मदतीची याचना करीत आहेत. दुर्देवाने बेजबाबदार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या संकटकाळात राजकीय लाभ उठविण्यासाठी “धरणे” कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा करतात हे माणुसकीच्या पलिकडे आहे असे दिगंबर कामत म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: