गोवा देश-विदेश

‘अर्धवेळ राज्यपाल कोविड हाताळणीवर कसे लक्ष देणार?’

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा राजनाथ सिंह यांना थेट सवाल

पणजी ​:
देशात खालावत चाललेल्या कोविड हाताळणीसाठी लष्कराची मदत घेणे उचित असल्याचे ​​संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना आता ​कळून आले ही चांगली गोष्ट आहे. ​​संरक्षण​मंत्र्यानी गोव्याचे अर्धवेळ राज्यपाल कोविड हाताळणीवर कसे लक्ष ठेवणार व जनतेला कसा न्याय देणार हे स्पष्ट करावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केली आहे.
काल संरक्षणमंत्री  राजनाथ सिंह यांनी विवीध राज्यांचे राज्यपाल व संघप्रदेशांच्या नायब राज्यपालांबरोबर बैठक घे​वू​न त्यांना कोविड हाताळणीसाठी लष्करातील माजी सैनिक अधिकारी, नर्सेस तसेच इतरांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावर ​प्रतिक्रिया देताना दिगंबर कामत यांनी ​सदर मागणी केली​. ​
आज गोव्यात अर्धवेळ राज्यपाल आहेत. त्यांच्यावर कोविडचा उद्रेक झालेल्या शेजारील महाराष्ट्राची जबाबदारी आहे. गोव्याचे भाजप सरकार दिशाहीन झालेले आहे व संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे कसलीच उपाय योजना नाही. या परिस्थितीत अर्धवेळ राज्यपाल कसा काय गोव्याला  न्याय देणार असा प्रश्न दिगंबर कामत यांनी विचारला आहे.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे २३ मार्च २०२० देशातील कोविड हाताळणीसाठी समाजातील विवीध क्षेत्रातील तज्ञ व लष्कराचे तज्ञ यांचा समावेश असलेल्या कृतीदलाची स्थापना करण्याची मागणी केली होती. परंतु, मागील एक वर्ष सरकारने आमच्या सुचनेवर कसलीच कृती केली नाही असे दिगंबर कामत म्हणाले.​ ​गोव्यात सरकारी बेजबाबदारपणामुळे कोविडने महाभयंकर रूप धारण केले आहे. दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. मृतांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. लोकांना कोविडच्या जबड्यात ढक​लू​न भाजप सरकार गप्प आहे.
राज्यात सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री व मंत्र्यांमध्ये कसलाच ताळतंत्र नाही. अधिकारी गोंधळलेले आहेत. आता काही स्थानिक पंचायतीनी परस्पर कंटेनमेंट झोन घोषीत केला आहे. राज्यात अराजक माजण्याची परिस्थिती आहे असा इशारा दिगंबर कामत यांनी दिला.

‘​सत्यपाल मलिक यांची उणीव भासते…’​ 
आज राज्यातील भाजप सरकार विरोधकांनी केलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यपालांकडे दाद मागण्याचा विचार केल्यास ते पुर्णवेळ उपलब्ध नसतात. आज गोव्याला माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची उणिव भासते असे दिगंबर कामत म्हणाले.​ ​माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नेहमीच गोमंतकीयांच्या हिताचा विचार केला. म्हादई, मांगोर हिल लॉकडाऊन, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा अश्या महत्वांच्या विषयांवर त्यांनी गोव्याची बाजू उच​लून धरली. हल्लीच शेतकरी आंदोलनावरही त्यांनी सडेतोड विचार मांडुन सरकारला जाब विचारण्याची हिम्मत दाखवली. गोव्यात अधिक काळ राहिल्यास बेजबाबदार भाजप सरकारची नाचक्की होणार हे लक्षात आल्यानेच त्यांची बदली करण्यात आली.​ ​संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क ​​​साधून गोव्यात ताबडतोब पुर्णवेळ राज्यपालांची नेमणुक करावी अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: