गोवा 

उद्यापासून राज्यातील टॅक्सीना डिजिटल मीटर अनिवार्ह

पणजी :​
राज्य सरकारने पर्यटन टॅक्सीवर 20 मे पासून डिजिटल भाडे मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहेडिजिटल मीटर बसविल्याशिवाय कोणत्याही परवानग्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

“डिजिटल मीटर बसविल्याशिवाय कोणत्याही परवान्याचे नूतनीकरण केले जाऊ शकत नाही. ​२० मे पासून टॅक्सी मालकाने अधिकृत प्रकारच्या विक्रेत्यामार्फत विशिष्ट प्रकारच्या डिजिटल मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहेत,​ निर्धारित वेळेत दर्शविलेले विशिष्ट मीटरमध्ये डिजिटल मीटर बसविण्यास अपयशी ठरल्यास नियम न पाळणाऱ्या वाहनांची परवानगी पुढील सूचना न देता रद्द केली जाईल.​असे ​परिवहन संचालक ​यांनी सांगितले. ​

अधिसूचनेनुसार, ‘जीएसटी’सह एक वर्षाची नि: शुल्क देखभाल आणि एक वर्षाचा डेटा आणि ऑनलाईन मॉनिटरिंग धरून शुल्क 11,344 / – रुपये ​असणार आहे. ​

परिवहन मंत्री माविन गुदीन्हो म्हणाले होते की राज्य सरकारने गोवा मोटार वाहन नियम -1991 च्या कलम 140 मध्ये दुरुस्ती केली आहे, ज्यात प्रत्येक मोटर कॅबला डिजिटल भाडे मीटर, प्रिंटर, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) आणि पॅनीक बटनसह बसवावे लागेल.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: