सिनेनामा

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

मुंबई :
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास  होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली आहे.

यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानू यांनी सांगितले होते. ‘आम्ही रुग्णालयात केवळ रुटिन चेकअप करण्यासाठी आलो आहोत’ असे सायरा बानू यांनी म्हटले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: