गोवा 

​कॉंग्रेस प्रभारी दिनेश राव यांची पर्तगाळ मठाला भेट

काणकोण/मडगाव :
अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे गोवा प्रभारी दिनेश राव  यांनी आज श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाला भेट देवून श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांचे आशिर्वाद घेतले. स्वामीजींचे  चातुर्मास व्रत सध्या मठात सुरू असुन दिनेश राव यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री रामदेव वीरविठ्ठल तसेच श्रीमद् विद्याधीराजतीर्थ स्वामीजींच्या समाधींचे दर्शन घेवून दिनेश राव यांनी  श्री विद्याधीश स्वामीजींकडुन फल मंत्राक्षता घेतल्या.

श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामीजींनी त्यांना आशिर्वाद देत, समाजासाठी निस्वार्थीपणे काम करण्याचा सल्ला दिला व लोकसेवेचे फळ नेहमी चांगलेच मिळते असे सांगीतले. मठाच्या अनेक योजनांची व कार्याची माहिती स्वामीजीनी दिनेश राव यांना दिले.

पांचशे वर्षांचा इतिहास असलेल्या मठास भेट देवून स्वामीजींचे आशिर्वाद घेणे माझे भाग्य आहे. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय दिवस असल्याचे दिनेश राव  यांनी सांगितले.

श्रीमद् विद्याधीराजतीर्थ स्वामींच्या महानिर्वाणाबद्दल दिनेश राव यानी सहवेदना व्यक्त केल्या व स्वामींच्या कार्याची आठवण लोक नेहमीच ठेवतील असे प्रतिपादन केले.​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: