गोवा 

”हा’ हल्ला म्हणजे राज्यातील अघोषित आणीबाणीचेच प्रतिबिंब’

मडगाव :
कोविड महामारीत संकटात सापडलेल्या कलाकारांना मदत करण्याच्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केल्यानंतर गोव्याचे नामवंत कलाकार व नट राजदीप नाईक यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे लोकांचा आवाज दाबण्यासाठी गोव्यात लादलेल्या अघोषीत आणिबाणीचे प्रतिबींब आहे असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केला आहे.

राजदीप नाईकांच्या गाडीवर हल्ला करुन मोडतोड करण्याच्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. मुख्यमंत्री आणि कला व संस्कृती मंत्र्यांनी ताबडतोब कृती करुन कलाकारांना योग्य मदत जाहिर करावी व दिलासा द्यावा.

गेल्यावर्षा पासुन मी सरकारकडे अर्थव्यवस्था चालीस लावण्यासाठी १०० कोटीचे पॅकेज जाहिर करण्याची मागणी करीत आहे. सरकारने माझे म्हणणे ऐकले असते तर आज कलाकारांसह अनेक व्यावसायीकांना दिलासा मिळाला असता असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: