देश-विदेशमहाराष्ट्रसिनेनामा

दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचे निधन

पुणे :

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचं काल अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते पुण्याला राहात होते पण त्यांच्या मुळ गावी नागपूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

‘बाबू बँड बाजा” सारख्या चित्रपटामधून समाजाचे वास्तविक दर्शन दाखवणाऱ्या दिग्दर्शकच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्व हळहळ व्यक्त करत आहे. अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजानी हे तीव्र मायोकार्डियल इन्फेक्शनमुळे myocardial infarction हृदयविकाराचा झटका आपल्यासोबत नाहीत ही दुःखद घटना. अतिशय जड अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पिंजाणी यांनी बाजू बॅंड बाजाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जगण्यातलं दु:ख मांडलं होतं. या चित्रपटात एका बॅन्डवाल्याचे आयुष्य नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा आरसाच आपल्याला पाहायला मिळाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: