क्रीडा-अर्थमत

‘या’ कंपनीने आणला खास भारतीयांसाठीचा डिशवॉशर 

मुंबई: 
गोदरेज समुहातील गोदरेज अॅन्ड बॉइस या कंपनीचा घरगुती उपकरणांचा व्यवसाय असलेल्या ‘गोदरेज अप्लायन्सेस’ने डिशवॉशरच्या उत्पादनामध्ये पदार्पण केले आहे. ‘गोदरेज इऑन डिशवॉशर्स’ ही नवीन श्रेणी सादर करीत असल्याची घोषणा ‘गोदरेज अॅन्ड बॉइस’तर्फे आज येथे करण्यात आली.

या नव्या उत्पादनाच्या सादरीकरणाविषयी बोलताना ‘गोदरेज अप्लायन्सेस’चे व्यवसाय प्रमुख व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “कोरोना साथीने ग्राहकांच्या ताणतणावात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरांत राहणारे ग्राहक सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. कार्यालयीन कामे घरातूनच करण्याची सक्ती असल्याने त्यांची दोन्हीकडे तारांबळ उडते. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने मोलकरणींवर अवलंबून राहण्यावरही मर्यादा आली आहे. अशावेळी घरगुती कामांचा व्याप व श्रम कमी करण्याच्या उद्देशाने अनेकजण डिशवॉशर्सची खरेदी करू लागले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच आम्ही स्वतः आरोग्य, स्वच्छता आणि श्रम कमी करण्याच्या संकल्पनांसाठी विविध तंत्रज्ञानांवर काम करीत आहोत आणि डिशवॉशरचे उत्पादनही आम्ही याच अनुषंगाने सुरू केले आहे. घरांतील कामांमध्ये डिश, भांडी स्वच्छ करणे हे खरे तर खूप वेळखाऊ व कष्टदायक काम आहे. अशा वेळी स्वच्छता, सोयीस्करपणा आणि कार्यक्षमता हे गुणधर्म असलेले गोदरेज डिशवॉशर्स उत्तम प्रकारे भांडी स्वच्छ करतात. कोविडपश्चात काळातही ही डिशवॉशर्सची मागणी अशीच सुरू राहील, कारण दिवसेंदिवस अनेक ग्राहकांना आपल्या रोजच्या जगण्यात या उत्पादनाचे मोल पटलेले आहे.”

‘गोदरेज इऑन डिशवॉशर’ हे मशीन भारतीय स्वयंपाकघरांसाठी अगदी योग्य आहे. यामध्ये ‘12 प्लेस’ आणि ‘13 प्लेस’ अशी सेटिंग्स असून त्यांतून 91 भांडी आणि कटलरी धुतली जातात. मोठ्या आकाराचे प्रेशर कुकर, कढई, पॅन, तवा आणि इतर सर्व प्रकारची स्वयंपाकासाठी लागणारी भांडी या मशीनमध्ये व्यवस्थित धुतली जातात. महागडे डिनर सेट आणि नाजूक कप, ग्लास यांच्यासाठीही हे उपयुक्त आहे. टेफलॉनचे नॉन-स्टिक कूकवेअर, सिरॅमिक, मेलामाइन, सिलिकॉन आणि प्लास्टिकवेअर, अशी डिशवॉशरसाठी सुरक्षित अशी गणना झालेली भांडीदेखील यात चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात.

डिशवॉशरमध्ये पाण्याचा फार वापर होतो, असा एक समज आहे. यावर तोडगा म्हणून ‘गोदरेज’च्या सर्व डिशवॉशर्समध्ये इको मोड देण्यात आलेला आहे. तो ऊर्जा वाचवितो आणि एका वेळच्या धुण्यामध्ये अगदी कमी, म्हणजे 9 लिटर पाण्याचाच वापर करतो. भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकात तेल, मसाले मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यांचे डाग भांड्यांना पडतात. तेदेखील या मशीनमध्ये निघून जातात. गोदरेज ब्रॅंडची पर्यावरण रक्षणाशी मोठ्या प्रमाणात बांधिलकी आहे. तिचे पालन या उत्पादनात होते.

Kamal Nandi, Business head, EVP, Godrej Appliances and President, CE...

‘गोदरेज डिशवॉशर्स’मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत :

  • भांड्यांवर असलेले विविध प्रकारचे डाग जात नसतील, तर त्याकरीता स्टीम वॉशहा चांगला उपाय आहे. भारतीय घरांमधील स्वयंपाकात अनेकदा भांड्यांवर तेला-तुपाचा चिकटपणा असतो, तसेच काही केल्या न जाणारे अन्नाचे डाग असतात. त्यांसाठी हा उपाय परिणामकारक ठरतो.

 

  • अद्वितीय असे अतिनील तंत्रज्ञानभांड्यांवरील जीवाणूंना काढून टाकते आणि डिशेस जंतूविरहीत करते. यातील अंगभूत आयोनायझर निगेटिव्ह आयन वापरुन भांड्यांना असलेला विशिष्ट गंध काढून टाकते.

 

  • स्मार्ट वॉश तंत्रज्ञानविशेष टर्बिडिटी सेन्सर प्रदान करते. पाण्यातील विविध अन्नकणांची मात्रा शोधून काढून त्यानुसार स्वच्छतेचे विविध मापदंड (तपमान, कालावधी, पाण्याचे प्रमाण, इ.) वापरले जातात. त्यामुळे प्रत्येक वेळी भांडी चांगल्या प्रकारे धुतली जातात. पाण्याच्या जडपणानुसार मशीनमध्ये काही अॅडजेस्टमेंट करता येतात.

 

  • डायरेक्ट वॉश फंक्शनमुळे ग्लास / फीडिंग बाटल्या यांसारख्या अरुंद तोंडाच्या बाटल्या चांगल्या पद्धतीने धुतल्या जातात. पॅन, कूकर यांसारखी भांडी धुण्याकरीता मशीनच्या मागील बाजूस 2 अतिरिक्त स्प्रे देण्यात आले आहेत. ट्रिपल वॉश फंक्शनमुळे ते कार्यान्वित होतात.

 

  • डिशवॉशरमधून वाफ काढून टाकण्यासाठी आणि भांडी पूर्ण कोरडी होण्यासाठी एक शक्तीशाली पंखा या मशीनमध्ये बसविण्यात आला आहे. स्पेशल टर्बो ड्रायिंग तंत्रज्ञानामुळे तो कार्यान्वित होतो. अतिशय चिकट झालेल्या भांड्यासाठी इन्टेन्सिव्ह 65 डिग्री वॉश प्रोग्रॅमया मशीनमध्ये आहे. या तंत्रज्ञानांमुळे ग्राहकांना मशीनमधून भांडी बाहेर काढल्यावर ती पुसत बसावी लागत नाहीत किंवा ती वाळण्याची वाट पाहावी लागत नाही. डिशवॉशरमधून भांडी काढल्यावर ती कोरडी, गरम आणि अगदी स्वच्छ असल्याचा आनंददायी अनुभव त्यांना घेता येतो.

 

  • ऑटो डोअर ओपनया वैशिष्ट्यामुळे ड्रायिंगच्या वेळी मशीनचा दरवाजा आपोआप किंचित उघडला जातो. त्यामुळे डिशेस सुकविण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा कमी लागते आणि सुकण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होते.

 

  • कार्यक्षम ‘बीएलडीसी इनव्हर्टर’तंत्रज्ञानामुळे गोदरेज इऑन डिशवॉशरमध्ये पाणी व वेळेची बचत होते. तसेच कमी ऊर्जा वापरून भांड्यांची स्वच्छता होऊन ती कोरडी होण्याची प्रक्रियाही चांगली होते. याकरीता या डिशवॉशरला युरोपीयन मानकांनुसार सर्वोच्च स्तरावरचे ए+++ हे ऊर्जा मानांकन देण्यात आलेले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: