सातारा 

कोरोनाला रोखण्यासाठी टिटवेवाडीत निर्जंतुककरण

​सातारा (महेश पवार)​ :​
तालुक्यातील टिटवेवाडी गावात वर्धन अॅग्रो साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी गावाला निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी मोफत औषधाचा पुरवठा केल्याने कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण गावात औषधाची फवारणी केली आहे. कदम यांनी टिटवेवाडी ग्रामपंचायतीस निर्जंतुक करणासाठी सोडीयम हायपोक्लोईड, 35 लि. सँनीटायझर 5 ली. आणि 100 मास्कचे वाटप करण्यात आले.

​टिटवेवाडी येथे नेते निवडणुकीतच गावात येतात किंवा त्यांच्या संबंधित व्यक्ती व नातेवाईक निवडणूक काळात मतदान मागण्यासाठी येतात.या काळात भरपूर असवासने देतात. परंतु कोरोनाच्या महामारित निवडून  गेलेले खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य या सकंटाच्या काळात टिटवेवाडी गावास कोणीच भेट दिली नाही.हे दुर्दैव म्हणावे लागेल. मात्र वर्धन अॅग्रो साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनीच गावाला निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी मोफत औषधाचा पुरवठा करून सामाजिक बांधीलकी जपली आहे.​

कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर टिटवेवाडी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात केली. संपुर्ण राज्य हे कोरोना महामारीच्या विळख्यात पडला असुन सातारा जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात कोरोनाचा संसर्गाचा मोठया वेगाने प्रसार होत असुन , कोरोनाची तिसरी लाट  येण्याची दाट शक्यता आरोग्य यंत्रणेकडुन व्यक्त करण्यात येत असुन याची तत्काळ दखल घेण्यात आली आहे.

यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच शिला सावंत, उपसरपंच राजकुमार चव्हाण, ग्रामसेवक नवनाथ आनंदा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य किरण पवार, ग्रामस्थ प्रफुल्ल पवार, रामचंद्र घोरपडे, विक्रम सावंत व ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र गायकवाड आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत निर्जतुकीकरण फवारणी करण्यात आली.

याप्रसंगी वर्धन अॅग्रो साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी ग्रामस्थांना कोरोना काळातील शासनाने लागु केलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे काहीही कारण नसतांना घराबाहेर फिरू नये मास्क वापरा व घरात राहावे सुरक्षित राहावे असे आवाहन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: