गोवा 

राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी

गोवा प्रदेश काँग्रेसचे राज्यपालांना लेखी निवेदन

पणजीः 
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून मुख्यमंत्री डाॕ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

कोविड -१९  या साथीचा रोगामुळे सर्व राज्यभर हाहाकार सुरू आहे. या महामारीचा वाढता संसर्ग रोखण्यात व परिस्थिती  हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार बरखास्त करणे गरजेचे आहे, अशी विनंती चोडणकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांना केली आहे.

राज्यपालांना  लिहिलेल्या पत्रात चोडणकर यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स, आवश्यक औषधे आणि रुग्णालयाच्या बेड्सच्या अभावी २,००० हून अधिक निष्पाप गोमंतकीयांचा मृत्यू झाला आहे व अजूनही ते सरकारच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन आणि कर्फ्यूद्वारे कोविडवर नियंत्रण आणले आहे. शिवाय कोविड रूग्णांना आवश्यक असणारी सर्व औषधे आणि पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर मिळवून देऊन साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. पण गोव्याचे मुख्यमंत्री आमची पुन्हा पुन्हा दिशाभूल करत खोटी माहिती देत राहिले. कोविड साथ रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी लोकांना ‘भिवपाची गरज ना’ असे सांगितले.

कॉंग्रेस अध्यक्षांनी राज्यपालांच्या पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या अशा चुकीच्या प्रचारामुळे गोव्यातील लोकांमध्ये खोट्या सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि उर्वरित देशातील प्रत्येकाला गोव्यात येण्याचे आमंत्रण दिले गेले. कोविड -१९ च्या अंतर्गत असणार्‍या वेगवेगळ्या राज्यांतील लोकांनी सर्व प्रकारच्या वाहतुकीद्वारे गोव्यासाठी एक मार्ग तयार केला आणि आमचे समुद्रकिनारे, नाईट क्लब, कॅसिनो आणि हॉटेलांची गर्दी  अधिक वाढवली. हे स्पष्ट आहे की आपली सरकार लॉक डाऊन किंवा कर्फ्यू लावण्यास नकार देत होते कारण त्यांना या हाॕटेल लॉबीला सांभाळायचे  होते. गोवा पर्यटनमंत्र्यांनीही मग मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. “शो अवश्य चालले पाहिजे” अशा घोषणा त्यांनी दिल्या. गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यात झालेल्या वादाकडे आणि परस्परांवरील आरोप- प्रत्यारोपाकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यातील जनतेचा तुमच्या सरकारवरील विश्वास कमी झाला आहे. गोव्यातील जनतेला संकटमय कोविड काळात दिलासा मिळावा म्हणून काहीही न करणाऱ्या  सावंत सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष गरीब चालवले आहे. याउलट आमच्या पक्षातील स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक निःस्वार्थपणे कोविड बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांना सेवा देत आहेत. सावंत सरकारची यंत्रणा त्यांना स्वयंसेवक म्हणून सहाकार्य करण्याऐवजी त्रास देण्यासाठी व्यस्त आहेत. हे सर्व पाहता आमचे ठाम मत आहे की आपल्या भ्रष्ट, सदोष, असंवेदनशील व कुचकामी सावंत सरकारला पदावर राहू देणे कोविड -१९ अधिक वाढविणारे आणि अर्थव्यवस्था कोलमडून टाकणारे ठरेल. जनतेच्या दु: खाच्या बाबतीत राज्याला आणखी दुर्दैवी घटनेकडे नेणारे ठरेल.

चोडणकर म्हणाले, घटनात्मक संस्था आणि  यंत्रणेत पूर्णपणे बिघाड झालेला आहे. कारण विद्यमान राज्य सरकारच्या अपात्र मुख्यमंत्र्यांनी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत अर्थात राईट टू लाइफच्या अधिनियमित लोकांच्या मूलभूत हक्काचे रक्षण करण्यासाठी त्यांचे मूलभूत घटनात्मक कर्तव्य पूर्णपणे बजावले नाही.  चक्रीवादळ ताऊक्तेच्या पार्श्वभूमीवर न केलेल्या पूर्व तयारीच्या बेजबाबदारपणाकडेही राज्यपालांचेही लक्ष वेधले आहे.

राज्याच्या मोठ्या हिताच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेताना, मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक हित राज्याच्या हिताच्या आड येत आहे. ज्यामुळे राज्याचे जीवन, आरोग्य आणि आर्थिक हितावर वाईट परिणाम  परिणाम झाला आहे. म्हणूनच आम्ही डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील तुमचे सरकार त्वरित बरखास्त करावे आणि कमिशन व कमिशनच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी करत आहोत, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: