गोवा 

‘आप’च्या वतीने ३०० एन ९५ मास्कचे वाटप

पणजी :
आप नेते वाल्मीकि नाईक यांनी सरफराज अंकलगी आणि ऍश्ले फुर्तादो यांच्यासह पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांना पणजी पोलिस स्टेशन येथे भेट दिली आणि त्यांच्या वापरासाठी 300 एन 95 चे मास्क प्रदान केले.

गोवा पोलिसांनी त्यांच्या अंतर्गत राज्यभरात शेकडो पॉझिटिव्ह प्रकरणे पाहिली आहेत आणि पणजीचे एसडीपीओ असलेले उप पोलिस अधीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्यासह दोनजण मृत्युला देखील ते सामोरे गेले आहेत. बर्‍याच कर्मचार्‍यांना तीव्र त्रास झाला आहे आणि ते अद्याप रूग्णालयात व घरी राहून उपचार घेत आहेत.

यासोबतच ‘आप’च्या पथकाने पणजी शहर महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कामगारांची भेट घेतली आणि 200 एन 95 चे मास्क प्रदान केले. ज्यांच्यात जवळजवळ 40 पॉझिटिव्ह प्रकरणे होऊन गेली आहेत आणि त्यामध्ये 2 मृत्यू देखील झाले आहेत.

नाईक यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला.
“आम्हाला अग्रभागी काम करत असलेल्या प्रत्येक योध्याबद्दल कृतज्ञता आहे. प्रत्येकालाच घरी राहण्याचा व सुरक्षित राहण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. ”, नाईक म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: