गोवा 

‘हळदोणे कॉंग्रेस’ने केले फळे, पाणी आणि मास्क वितरण 

म्हापसा​ :​
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहताना हळदोणे कॉंग्रेस गटाने लोकांना फळे, पाणी आणि मास्क वितरीत के​ले. ​हळदोणे कॉंग्रेस गटाने येथील वृद्धाश्रमात जावून ज्येष्ठ नागरिकांना फळे वितरित केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून रुग्ण व कर्मचाऱ्यांना मास्क वितरीत केली. तसेच रुग्ण आणि त्यांच्या बरोबर असलेल्या नातेवाईकांना पाण्याच्या बॉटल देण्यात आल्या.

कोविड  -१९ चा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे आवश्यक असल्याने  त्याची  जागरूकता वाढवण्याचे महत्त्व जाणून, हळदोणे कॉंग्रेस गट सदस्यांनी बाजारपेठेत जाऊन मास्क वितरित केली.​ ​हळदोणे कॉंग्रेस गटाने राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि नंतर कोविडविषयी जागरूकता करण्यासाठी त्यांनी अनेक भागांचा दौरा केला.

“माजी पंतप्रधान राजीव गांधी,  टेलिकॉम, पंचायती राज आणि इतर क्षेत्रातील योगदानासाठी परिचित होते. त्यांनी नेहमीच समाजहितासाठी काम केले. कॉंग्रेस पक्ष त्यांच्या कार्यापासून प्रेरित आहे आणि लोकांची नेहमीच मदत करेल. ” असे पणजीकर म्हणाले.

आश्विन डीसौझा म्हणाले की, कोविडच्या या कठीण काळात एकमेकांना मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, म्हणून आपण मदतीचा हात द्यावा. “आम्ही लोकांना शक्य तेवढे मदत केली पाहिजे, जेणेकरून या कोव्हिडच्या हल्ल्यामुळे त्यांना थोडा दिलासा  मिळेल.” तो म्हणाला.

कोविड महामारीच्या पहिल्या लाटेच्या वेळी, गेल्या वर्षी आणि लॉकडाऊन दरम्यान हळदोणे कॉंग्रेसने गरजू कुटुंबांना मोफत किराणा सामान वितरित केले होते. तसेच लोकांना औषधे व इतर आवश्यक वस्तू दिल्या होत्या.​ आ​ता, दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांनी लोकांना ऑक्सिजन सिलिंडर, औषधे, कोविड किट, आणि रुग्णांना इस्पितळात नेण्याची आणि पुन्हा घरी आणण्याची सेवा दिली आहे.
congress
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: