सातारा 

रणजितसिंह देशमुख यांच्यावतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप

मायणी​ (अभयकुमार देशमुख) :​
भारताचे ​दिवंगत पंतप्रधान ​रा​जीवगांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय काँग्रेस व हरणाई सूत गिरणीचे संस्थापक अध्यक्ष ,खटाव -माणचे नेते रणजितसिह देशमुख यांच्या वतीने खटाव व माण तालुक्यातील कोविड सेंटरला सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले.

यावेळी ​प्रतिनिधीक स्वरूपात मायणी येथील कोविड सेंटरला सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले .यावेळी मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक व ​​अध्यक्ष डॉ एम आर देशमुख, उपाध्यक्ष दीपक देशमुख, कलेढोणचे नेते संजीव साळुंखे, मायणीचे काँग्रेसचे युवा नेते शंकर माळी,​ जावेद शेख, पत्रकार मारुती पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते​. 

यावेळी डॉ​. देशमुख म्हणाले की रणजितसिह देशमुख हे नेहमी गरजू आणि गरीब लोकांपर्यंत पोहचत असतात .आतच आठ दिवसापूर्वी रमजान ईद च्या निमित्ताने खटाव व माण तालु​क्यातील ​गरीब आणि गरजू मुस्लिम कुटुंबाना मदतीचा हात म्हणून गरजू किट (साहित्य) वाटले यामुळे ज्या मुस्लिम कुटुंबाला ईद साजरी करता येणार नव्हती ते रणजित भैय्या यांनी केलेल्या मदतीमुळे करण्यास थोडी फार मदत झाली .आणि आज राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त कोविड रुग्णासाठी मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले .त्यांच्या या स्वभावामुळे खटाव माण मधील जनता त्यांच्यावर भरभरून प्रेम करते हे काय वेगळे सांगायला नको.
Ranjit Deshmukh
रणजितसिंह देशमुख

यावेळी संजीव साळुंखे म्हणाले की हा गुण आणि स्वभाव हा रक्तात असावा लागतो नाहीतर असे अनेक लोकप्रतिनिधी आहेतच की ज्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही​. सरकारी काही मिळाले की त्याचा मोठा गा​जावाजा करायचा आणि मीच केले ​अ​सा आव आणायचा​, ​मात्र स्वतः च्या खर्चातून मात्र जनतेसाठी एकही रुपया खर्च करायचा नाही​, ​​अ​शी ही रीत आहे.

काँग्रेस पक्ष हा नेहमी जनतेच्या आणि देशाच्या हिताचे काम करीत असतो.​ ​त्यातच गांधी घराण्याचे दे​शा​साठीचे बलिदान कोणीही विसरू शकत नाही .आज जो डिजीटल भारत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्यामुळेच  त्यांनी भविष्याचा विचार करून भारत देश संगणिकृत करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते पूर्ण केले  आजचा जो भारत आहे तो  .इतर देशांच्या तुलनेत आपला देश कुठेच कमी नाही ते केवळ राजीव गांधी  यांच्यामुळेच शक्य झाले .

शंकर माळी म्हणाले की खटाव आणि माण मध्ये रणजितसिह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोमाने काम करून गावो गावी काँग्रेस पक्षाची फळी उभा करू व ज्या ज्या वेळेस जनतेला आमची गरज असेल त्या त्या वेळेस आम्ही त्यांच्या साठी आशा कामाच्या मदतीने धावून जाऊ. आभार दीपक देशमुख यांनी मानले​.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: