गोवा 

‘मिशन फॉर लोकल’तर्फे शिक्षकांना मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप 

​पेडणे (प्रतिनिधी) :

शिक्षक कधीच सामान्य असू शकत नाही. समाजाचा हा शिल्पकार सतत समाजाचे भवितव्य उज्वल बनविण्याचे काम करत आहे. कोरोनाच्या संकटात मदत करण्यास पुढे आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासोबत कोरोनाकाळात देशरक्षक म्हणून शिक्षकांनी केलेले हे काम विसरता कामा नये.

आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्याचा भाग मानून आपली सेवा बजावणारे शिक्षक हे आता कोविडयोद्धा म्हणून पुढे सरसावले आहेत. सरकारी प्राथमिक शिक्षक तसेच सरकारी इंग्रजी शिक्षक गेल्या ११ मे पासून कोविड कॉल सेंटरवर पेडणे येथे काम करत आहेत.​ ​यात ते घरी विलगीकरणात असलेल्यांना कॉल करून त्यांच्याकडून रुग्णाच्या तापमानाची माहिती, तसेच अन्य माहिती घेऊन ती नोंदणी करून ती माहिती आरोग्य केंद्राला पाठविण्याचे काम करत आहेत.

हे शिक्षक विर्नोडा येथील संत ​​सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयात खास सुरु केलेल्या काऊंटरवर सकाळी ८ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री ८ अशा पद्धतीने शिक्षक काम करत आहेत.

हे शिक्षक फ्रटलाईन योद्धा म्हणून काम करत असून;​​ त्यामुळे रुग्णाना व त्याच्या नातेवाईकांना बरीच मदत होत असून मानसिक समाधान लाभत आहे. शिक्षकांच्या या सेवेचे ‘मिशन फॉर लोकल,पेडणे’ या संस्थेचे संस्थापक राजन कोरगांवकर यांनी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करुन ज्या ठिकाणी काही समस्या असेल ती आमच्या नजरेस आणून द्या जेणेकरून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना योग्य त्याप्रकारे मार्गदर्शन व हातभार लावून मदत करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी  राजन बाबूसो कोरगांवकर (मिशन फॉर लोकल, पेडणे) वसंत देसाई (पंच सदस्य, कोरगांव पंचायत) किसन कोरगांवकर  निश्चल शेट्ये आदी उपस्थित होते​. ​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: