सिनेनामा

२१ रोजी मिळणार  ‘दिठी’ अनुभव

मुंबई :

सुप्रसिद्ध चित्रपटनिर्मात्या सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दिठी’ या त्यांच्या अखेरच्या मराठी चित्रपटातून एका साध्या लोहराची कथा आपल्यासमोर येते. त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या वेदना, त्याचे दु:ख आणि अद्वैतवादाचा सिद्धांत अनुभवण्याच्या त्याच्या प्रवासाची ही गोष्ट आहे.

सुमित्रा भावे यांना 6 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 11 राष्ट्रीय पुरस्कार आणि 45 हून अधिक राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या असंख्य कथा, पटकथा, गीते, त्यांचे कला दिग्दर्शन, वेशभुषा आणि दिग्दर्शनासाठीही त्यांना अनेक पुरस्कारांनी मानांकित करण्यात आले आहे.

या सिनेमात किशोर कदम, शशांक शेंडे, अमृता सुभाष, अंजली पाटील, गिरीश कुलकर्णी, मोहन आगाशे. दिलीप प्रभावळकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसंच डॉ. मोहन आगाशे यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुराही सांभाळलीय.

दिठी हा  मराठी चित्रपट २१ मे रोजी सोनी लिवओरिजिनल्सवर प्रदर्शित होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: