गोवा देश-विदेश

‘सरकारमुळेच होत आहे घटस्फोटांत वाढ’

काँग्रेसची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका 

पणजी :
केंद्र व राज्यातील भाजप सरकारला लोकांना मुलभूत सुविधा देण्यात आलेले अपयश हेच वाढत्या कौटुंबिक कलहाचे प्रमुख कारण असुन, त्यामुळेच आज घटस्फोट प्रकरणांत वाढ होत आहे असे कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे. भाजपने राजकीय घटस्फोटाना प्रोत्साहन देणे बंद करुन, तरुण पिढी समोर एक आदर्श ठेवावा असा टोला त्यांनी लगावला आहे.

कायदा मंत्री निलेश काब्राल यांनी यापुढे  विवाह नोंदणीच्या वेळी जोडप्यांना समुपदेशन करण्यात येणार असल्याच्या केलेल्या घोषणेवर अमरनाथ पणजीकर यांनी प्रतिक्रीया देत भाजप सरकारच्या गैरव्यवस्थापन व चुकीच्या धोरणांना कौटुंबिक कलह होण्यास जबाबदार धरले आहे.

भाजप सरकार सत्तेत आल्यापासुन, एका मागोमाग एक चुकीचे निर्णय घेत गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसलाही विचार न करता डिमोनेटायजेशनची घोषणा केली. कसलीच पुर्वतयारी न करता जिएसटीची अमंलबजावणी करण्यात आली. अविचारी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन जाहिर करुन मोदी सरकारने देशाचा आर्थिक कणाच मोडुन टाकला. भाजप सरकार देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यास पुर्णपणे अपयशी ठरले. यामुळे सामान्य लोकांचे घरगुती बजेट कोलमडले.

गोवा सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीत ढकलले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनी एकतर्फी निर्णय घेवुन केलळ राजकीय स्वार्थासाठी खाण व्यवसाय बंद पाडला व त्याचवेळी गोव्यात आर्थिक आणिबाणी सुरू झाली. त्यानंतरच्या भाजप सरकारांनी भ्रष्ट व नियोजन शुन्य कारभाराने पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले. गोव्याची सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणुन प्रतिमा निर्माण करण्यास भाजप सरकार नाकामी ठरले अस दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

कायदा मंत्र्यांनी मागिल काहि वर्षात गोव्यात घटस्फोटाची प्रकरणे वाढल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या या विधानाचे मी स्वागत करतो. गोव्यातील वाढत्या सामाजीक असुरक्षितते मुळेच आज कौटुंबिक कलह वाढत आहेत हे निलेश काब्राल यांनी लक्षात घेतले पाहिजे.

amarnath
अमरनाथ पणजीकर

आज उच्च शिक्षीत तरुण नोकरीविना बेकार आहेत. सरकारने त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्धच केलेल्या नाहीत. लोक वाईट दिवसांचा अनुभव घेत असताना, भाजप “अच्छे दिन” ची दवंडी पिटण्यात धन्यता मानत आहेत. कायदा मंत्री निलेश काब्राल यांनी वाढत्या घटस्फोटां बद्दल केलेले वक्तव्य म्हणजे भाजप सरकारच्या अपयशाची कबुलीच आहे असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

गोव्याच्या कायदा मंत्र्यांनी भाजप नेतृत्वाला एक प्रस्ताव पाठवुन भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जनादेश पाळण्यासबंधी एका समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यास सांगावे. भाजप “राजकीय घटस्फोटांना” प्रोत्साहन देवुन इतर पक्षातील आमदार फोडुन आपला सत्तेचा संसार चालविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपने गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश व इतर काही राज्यांत राजकीय घटस्फोट करुन मागील दाराने सत्ता काबीज केली. केवळ स्वार्थासाठी केलेले “राजकीय विवाह” जास्त काळ टिकत नाहीत हे निलेश काब्राल यांनी भाजप नेतृत्वाला पटवुन द्यावे अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

आज भाजप सरकार दिशाहीन झाले आहे. केवळ विवाह नोंदणीच्यावेळी समुपदेशन करुन काम भागणार नाही. सरकारने या एकंदर समस्येच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. लोकांना मुलभूत सुविधा देणे गरजेचे असुन, सामाजीक सुरक्षा मिळाली तरच कौटुंबिक कलह कमी होतील असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: