देश-विदेश

तामिळनाडू डीएमकेचे, केरळ पुन्हा ‘डावी’कडेच!

थिरुअनंतपूरम :
केरळ विधानसभेच्या १४० जागांचे कल स्पष्ट झाले असून डावे आपली सत्ता राखण्यात यश मिळवितील असा अंदाज आहे. डाव्यांना ८९ तर काँग्रेसला ४६ जागांवर आघाडी असून येथे डाव्यांना अजून ७ जागांवर पिछाडी मिळाली आहे तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत डीएमकेने (DMK party) पहिल्या टप्प्यात १३३ तर एडीआयएएमकेने १०० जागांवर आघाडी घेतली आहे. डीएमके ३५ जागांवर पुढे असून ३६ जागांवर सत्ताधारी मागे आहेत.
केरळमध्ये डावे पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी जोरदार टक्कर झाली. काँग्रेसने समाधानकारक कामगिरी केली असून ८९ जागा विजयासमीप आहेत. डावे पुन्हा एकदा विश्वासाला पात्र ठरत सत्तेकडे कूच करत आहेत. दुसरीकडे तमिळनाडूमध्ये एआयडीएमके आणि डीएमके (DMK party) यांच्यात थेट लढत आहे. तामिळनाडू येथे डीएमके आणि काँग्रेसची आघाडी असून एआयडीएमकेने भाजपशी आघाडी केली आहे. एक्झिट पोलमध्ये स्टॅलिन यांना बहुमत मिळेल असा अंदाज होता. त्यादिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.
तामिळनाडूत डीएमकेने काँग्रेसच्या मदतीने सत्तेचा सोपान सर करत असून बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. १३३ जागांवर निर्णायक आघाडी घेतली असून अन्य ३५ जागा पुढे आहेत. सत्ताधारी एआयडीएमकेला झटका बसला असून १०० जागा मिळाल्या आहेत. तर ३६ जागा पिछाडीवर आहेत.
kerala electionकेरळ विधानसभेची 140 सदस्यीय मुदत 1 जून रोजी संपत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीने 2016 च्या विधानसभा निवडणुकीत 91 जागा जिंकल्या. पिनारायी विजयन हे राज्याचे 12 वे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट दुसर्‍या क्रमांकावर आहे. या वेळीही दोघांमध्ये कडक टक्कर आहे.
तामिळनाडूत सध्या पलानीस्वामी मुख्यमंत्री असून त्यांनी भाजपशी आघाडी केली आहे. शशिकला यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने त्याचा फायदा पक्षाला होईल असे सांगितले जात होते. मात्र, तसेच झाले नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!