सिनेनामा

’माहितीपट अत्यंत महत्वाचे माध्यम ’

पणजी :
गेल्या वर्षांच्या तुलनेत, यंदाच्या महोत्सवात अगदी कमी माहितीपट आले आहेत.लघुपटांच्या तुलनेत माहितीपटांची संख्या कमी आहे. बिगर फिचर फिल्म विभागाला माहितीपट आणि लघुपट विभाग असे म्हटले जावे अशी सूचना करतानाचा, एक माध्यम म्हणून माहितीपटांचे महत्व अधिक असल्याचे दिग्दर्शक आणि बिगर फिचर फिल्म समितीचे अध्यक्ष हौबम पबन कुमार यांनी सांगितले.
51 व्या इफ्फीतील इंडियन पॅनोरमाविभागाच्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी फिचर फिल्म्स, विभागाचे अध्यक्ष जॉन मॅथ्यू मॅथन, बिगर फिचर फिल्म समितीचे अध्यक्ष हौबम पबन कुमार, फिचर फिल्म ज्युरी समितीच्या सदस्य जादूमोनी दत्ता यांच्यासह इतर ज्युरी सदस्य या पत्रपरिषदेला उपस्थित होते.

यंदाच्या महोत्सवात अनेक युवा चित्रपट निर्माते आहेत. यंदा 60 ते 70 पेक्षा अधिक युवा चित्रपट निर्माते आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. या विभागातील पहिला सिनेमा ‘सांड की आंख’ देखील युवा चित्रपट निर्मात्याने बनवला आहे. असेही कुमार यांनी नमूद केले. आलेल्या प्रवेशिकांमधून महोत्सवासाठी चित्रपटांची निवड करणे हे सर्व ज्युरी सदस्यांसाठी मोठे आव्हान होते. मात्र कुठलाही वादविवाद न होता आम्ही एकमताने ही निवड केली. अशी माहिती जॉन मॅथ्यू मॅथन यांनी दिली.

 

IFFI LOGOफिचर फिल्म च्या ज्युरी समितीत 12 सदस्य असून ते सर्व उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक तर आहेतच शिवाय विविध चित्रपट विषयक संस्था आणि व्यवसायांमध्ये त्यांचे महत्वाचे स्थान आहे. हे सगळे जण मिळून भारतीय चित्रपटांमधील विविधरंगी पैलूंचे एकत्रित रूप आहेत.

तुषार हिरानंदानी निर्मित सांड की आंख चित्रपटाची उद्घाटनाचा चित्रपट म्हणून निवड करण्यामागचे कारण विचारले असता, त्यांनी सांगितले की या चित्रपटात असे अनेक पैलू आहेत, जे ज्युरी सदस्यांना विशेष भावले.
चित्रपटनिर्मात्या आणि पत्रकार तसेच, ज्युरी सदस्य संघमित्रा चौधरी, यांनी यंदाच्या ईफ्फीमध्ये आलेल्या नवोदित दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांसाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. या सर्वांनी आपल्या चित्रपटातून समकालीन विश्व मांडले आहे, असे त्या म्हणाल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: