महाराष्ट्र

‘आषाढवारीमध्ये खंड पडू देऊ नका…’

आमदार बबनराव लोणीकर यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
महाराष्ट्रातील आषाढी वारी ही अखंड महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे या वारीमध्ये खंड पडू नये अशी महाराष्ट्रातील तमाम टाळकरी, माळकरी, धारकरी आणि वारकऱ्यांची भावना आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकार ने घालून दिलेले सर्व नियम पाळून वारीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

महाराष्ट्र ही संतांची भूमी मध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत मीराबाई, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ महाराजांपासून अनेक साधू संत होऊन गेले आहेत. या साधू-संतांनी समस्त मानव जातीला प्रेरित करण्याचे आणि मानवजातीच्या उद्धारासाठी प्रयत्न केले आहेत या सर्व साधू संतांच्या माध्यमातून महाराष्ट्राला आषाढी वारीची एक अलौकिक अशी परंपरा लाभली आहे दरवर्षी लाखो लोक पायी चालत पंढरपूरला वारीसाठी जात असतात. महाराष्ट्राची अशी अलौकिक परंपरा असलेल्या वारी आहे खंड पडू नये यासाठी लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे

केवळ आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर एवढेच नव्हे तर अख्या महाराष्ट्रातून, महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने कूच करत असतात. या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे परंतु कोरोना महामारी च्या संकटात संपूर्ण जग होरपळून निघाले असताना मागील वर्षीपासून खंड पडत आहे. ही वारीची परंपरा खंडित होत आहे याचं शल्य महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायातील लोकांना आहे. असे देखील माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: