कला-साहित्य

कवी परेश कामतांना डॉ. टी. एम्. ए. पै पुरस्कार

मडगाव:
गोव्याचे नामवंत कवी परेश नरेंद्र कामत यांच्या ‘रंगबोली ‘ या कोंकणी कविता संग्रहाला मणिपाल फांऊडेशनचा प्रतिष्ठेचा डॉ टी. एम्. ए. पै उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार 2019 जाहीर करण्यात आला. मानपत्र व पंचवीस हजार रूपये रोख अशा स्वरूपांत हा पुरस्कार मणिपाल येथे होणाऱ्या एका खास कार्यक्रमात श्री कामत यांना दिला जाणार आहे.
आतापर्यंत ‘ अळंग ‘, ‘गर्भखोल’, ‘ शुभंकर’, ‘चित्रलिपी ‘ व ‘ रंगबोली ‘ असे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध झालेल्या कामत यांना त्यांच्या ‘ चित्रलिपी ‘ या कविता संग्रहाला २०१८ साली केंद्रिय साहित्य अकादेमी पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यांच्या साहित्याला यापूर्वी गोवा सरकारचा ‘ युवा सृजन पुरस्कार’, मुंबईचा गोवा हिंदू असोसिएशनचा पद्मश्री बा. भ. बोरकर स्मृती पुरस्कार, कला अकादमी साहित्य पुरस्कार, जनगंगा साहित्य पुरस्कार, गोवा कोंकणी अकादेमी सर्वोत्कृष्ठ साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
कवी परेश कामत यांच्या कविता मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, पंजाबी, उडिया, कन्नड अशा अनेक भाशांत अनुवादीत झालेल्या आहेत. मेघालय, बंगळुरू, केरळ, नागालँड, कोणार्क, औरंगाबाद, हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनांत ते सहभागी झाले आहेत. त्यांच्या कवितांची बी. ए. व एम्. ए. च्या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: