क्रीडा-अर्थमतगोवा 

आता गोव्यातील दुर्गम भागातही पोहोचणार वीज

पणजी :
एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडची पूर्ण मालकी असलेली सहयोगी कंपनी कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडने गोवा राज्यातील दुर्गम भागातील आजवर अपुरी वीजसुविधा असलेली गावे घरगुती वीज उपलब्धतेबाबत सक्षम करण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित पीव्ही यंत्रणा उभारणीसाठी गोवा ऊर्जा विकास यंत्रणा समवेत सहकार्य करार केला आहे. या करारानुसार, दुर्गम ग्राम विद्युतीकरण (आरव्हीई) प्रकल्पाच्या माध्यमातून सीईएसएलद्वारे आगामी पाच वर्षांत सौर पीव्ही प्रणालीची उभारणी व देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी उचलली जाणार आहे.

सीईएसएलद्वारे हा गोव्यातील पहिला ऑफ-ग्रिड विद्युत प्रकल्प ठरणार आहे. याबाबतच्या करारावर जीईडीएचे सदस्य-सचिव संजीव जोगळेकर यांनी आणि सीईएसएलच्या वतीने सरव्यवस्थापक तरुण तयाल यांनी स्वाक्षरी केली.

या कराराबाबत सीईएसएलचे तरुण तयाल म्हणाले, “गोवा राज्यासाठी ऑफ-ग्रिड विद्युतीकरणाच्या सुविधा उभारणीच्या कामात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. सर्व घऱांसाठी ऊर्जा सुविधा ही प्राथमिक गरज असून विकासासाठी पायाभूत गरज ठरत असते. जीईडीएसमवेतचा हा प्रकल्प भारतातील ऊर्जा क्षेत्राच्या परिवर्तनासाठी महत्त्वाचा ठरणार असून इतर राज्यांतील ऊर्जा विभागांसाठी प्रोत्साहनकारक ठरणार आहे.”

जीईडीएचे सदस्य-सचिव संजीव जोगळेकर म्हणाले, “गोवा राज्यास हरित ऊर्जा राज्य म्हणून विकसित करण्याच्या उद्देशासाठी हा सौर ऊर्जा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. केवळ लोकांसाठीच नाही तर पर्यावरणासाठीही सुरक्षित असे सौरऊर्जा सारखे ऊर्जा निर्मिती आणि कार्यक्षम प्रकाशीकरण पर्यायांचा राज्यभर अवलंब वाढवण्याच्या उद्देशाने जीईडीए कार्यरत आहे. गोव्यामध्ये याकामी सीईएसएलने पुढाकार घेतल्याची ही आनंदाची बाब आहे.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: