गोवा 

”एंटरटेनेंट सिटी’ हा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार’


पेडणे (प्रतिनिधी) :

मांद्रे पंचायत क्षेत्रात मनोरंजन ग्राम उभारण्यासाठी कुणी मागणी केली होती का , वेगवेगळ्या संगीत रजनी आयोजित करण्यासाठी सरकारी जागेत जो प्रकल्प आणण्याचा घाट आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेअरमन दयानंद सोपटे यांनी घातलेला आहे तो केवळ निव्वळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आणि म्युझिक ईवेंट म्हणजेच आमदार खुलेआम ड्रगसला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप मगोचे नेते जीत आरोलकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

कलाकारासाठी मात्र रवींद्र भवन उभारण्यास सरकारला जागा मिळत नाही ,असे सांगून म्युझिक ईवेंटला आमचा प्रखर विरोध आहे पर्यटनाला वाव देणाऱ्या प्रकल्पाचे स्वागत असेल मात्र जनतेचे हित न जपणाऱ्या प्रकल्पाला आमचा विरोध असेल असे जीत आरोलकर यांनी इशारा दिला.

किनारी भागात एका पेक्षा एक तारांकित सुविधा असलेली हॉटेल असताना आणखी तारांकित हॉटेलची काय गरज आहे असा प्रश्न जीत आरोलकर यांनी मांद्रे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत केला .

जीत आरोलकर यांनी पुढे बोलताना मांद्रे पंचायत क्षेत्रात ३०० कोटी रुपये खर्च करून पर्यटन खात्यातर्फे मनोरंजन ग्राम उभारण्याची घोषणा केली. त्या प्रकल्पाची कोणी मागणी केली होती का? पंचायतीला कुणी विश्वासात घेतले का , असे विविध प्रश्न उपस्थित करून निवडणूकीच्या तोंडावर या प्रकल्पाचे भूमिपूजन करणे आणि फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार, त्यामुळे नेमका साडेचार वर्षानंतरच प्रकल्पाची घोषणा का असा प्रश्न जीत आरोलकर यांनी उपस्थित केला आहे .

अर्धवट प्रकल्प पूर्ण करा

जीत आरोलकर यांनी बोलताना तालुक्यात आरोग्याची समस्या गंभीर आहे , रुग्णाना म्हापसा किंवा बांबोळी येथे उपचारासाठी जावे लागते , तुये येथे अर्धवट असलेल्या हॉस्पिटलमध्ये सोई सुविधा पुरवून ते कार्यरत करण्याची गरज आहे , हा निधी या हॉस्पिटलसाठी वापरा .

आयटी प्रकल्प कुठे आहे?

जीत आरोलकर यांनी बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आयटी प्रकल्प आणला . त्यानंतर त्या प्रकल्पाचा जो निवडून येतो त्या आमदाराने पाठपुरवा करायला हवा होता , त्यांनी साडेचार वर्षात काय केले असा प्रश्न जीत आरोलकर यांनी मांडला .

कोरोनाबाधिताना आर्थिक मदत द्या

मांद्रे मतदारसंघात पर्यायाने पूर्ण राज्यात कोरोना महामारीतून तीन हजार पेक्षा जास्त नागरीकांचे बळी गेले , त्यांच्या कुटुंबियाना या निधीचा सरकारने वापर करावा अशी मागणी आरोलकर यांनी केली .

म्युझिक इव्हेंट बंद करू :

आपण मांद्रे मतदारसंघातून मगोचा आमदार म्हणून निवडून आल्यास अगोदर मनोरंजन ग्राम रद्द करून सर्वात प्रथम किनारी भागात पर्यटन हंगामात ज्या गैरसोयी आहेत त्या दूर केल्या जातील . गावागावात वाड्या वाड्यावर घराघरात कलाकार आहे . मात्र आजपर्यंत तालुक्यासाठी कुणी रवींद्र भवन उभारले नाही त्या कलाकाराना त्यांच्या हक्काचे स्थान मिळवून देणार असल्याचे जीत आरोलकर यांनी दावा केला .

आमदाराने फेरविचार करावा

मांद्रे घोषणा केलेल्या प्रकल्पात नक्की काय असेल त्याची आजही स्थानिक पंचायतीला माहिती नाही . ती अगोदार द्यावी ,या भागात सनबन सारख्या ईवेन्ट साठी विरोध असेल , आमचा प्रकल्पाना विरोध नाही मात्र लोकाना काय हवे ते अगोदर पहावे .किनारी भागात असलेल्या हॉटेल व्यावसायीकाना व्यवस्थित पार्किंग नाही , पर्यटन हंगामात नागरिक रस्त्यावर वाहने लावून ट्राफिक जाम करतात त्यावर अगोदर आमदाराने उपाय योजना करावी अशी मागणी जीत आरोलकर यांनी केली . किनारी कसल्याच आरोग्य सुविधा नाही. त्या अगोदर पुरवाव्यात. आणि साडेचार वर्षांनी प्रकल्प आणण्यामागचा हेतू आमदार आणि सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या जागेत दरवर्षी झाडे लावतात

या जागेत दरवर्षी मान्द्रेतील काही निसर्गप्रेमी पर्यावरण युवक झाडे लावून हा परिसर हरित परिसर करण्याचे त्याचे स्वप्न आहे , ते स्वप्न साकार करण्यासाठी लोकप्रतिनिधीने पाठबळ द्यायला हवे , मनोरंज ग्राम ऐवजी प्राणवायू प्रकल्पाची खरी गरज आहे , तो आणावा असे जीत म्हणाले .

पर्यटकाना वाव देताना पर्यावरण राखणारे व ईको फेण्डली प्रकल्प आणावे , संगीत ईवेंट आयोजित करून ड्रग्स ला प्रोत्साहन द्यावे असे जीत यांनी सांगून ३०० कोटी कुठून आणणार . बाहेरच्या लोकाना जमिनी देवून खाजगीकरण करणे योग्य नव्हे . स्थानिकाना या प्रकल्पाचा काहीही फायदा होणार नसल्याचे दावा आरोलकर यांनी केला .

स्थानिकाना लाभ होणारा प्रकाल्प जर आमदार आणत असेल तर आपण त्याचे स्वागत करेन असे सांगितले .सनबर्न सारख्या ईवेन्टला लाख भर नागरिक उपस्थित असतात त्याची सोय किंवा साऊंड प्रुफ कसे करणार असा प्रश्न उपस्थित केला .सर्वसामान्य नागरिकांचे पोट चालत नाही तर प्रकल्प काय कामाचे असे त्यांनी म्हटले .

चक्रीवादळ येवून पाच दिवस पाणी नाही वीज नाही , त्यावर अजून काही काही उपाय नाही , परत वादळ आले तर सरकारी यंत्रणा सक्षम आहे का असा सवाल करून हे प्रश्न सोडवण्याची अगोदर गरज असल्याचे त्यांनी सांगितले . अजून मदत मिळाली नाही , ती अगोदर द्यावी.

माध्यमांनी आवाज उठवावा

नको असलेले प्रकल्प तालुक्यात आमदारांच्या हितासाठी आणले जातात त्यावर मिडीयाने आवाज उठवण्याचे आवाहन जीत आरोलकर यांनी केले . मिडीयाने पर्यटन खात्यात जावून या प्रकल्पाची चौकशी करावी , या प्रकल्पाची गाजर सरकारने समोर करून कुणालातरी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे . जॉब चे गाजर आता आमदार आणि सरकारला तारू शकत नाही असा दावा आरोलकर यांनी केला .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: