गोवा 

सर्वण  पार्वती -नगर येथे पर्यावरण दिवस साजरा

डिचोली :
पार्वती – नगर सर्वण येथे पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. स्थानिक पंच व सर्वण- कारापूर पंचायतीचे सरपंच गोकुळदास सावंत यांच्या पुढाकाराने रस्त्यानजीक रोपटे लावण्यात आली.
गोकुळदास यांनी आपले विचार माणताना सांगितले की 5 जून पर्यावरण दिवसाचं महत्त्व पर्यावरणामुळेच आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचं जीवन शक्य आहे. पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या दिवसामागील उद्देश आहे. लोकांमध्ये पर्यावरणाप्रति जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. पर्यावरण प्रेमी नकुळ धावस्कर यांनी सांगितले
शक्य असल्यास यंदा आपल्या घराच्या  बागेत छोटी रोपं लावा.पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचा महत्त्व आहे. मनुष्य आणि पर्यावरण यांचं अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही.अध्यक्ष नितेश गावस व स्थानिक उपस्थित होते.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: