क्रीडा-अर्थमत

इएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेच्या नफ्यात वाढ

मुंबई :
ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षाच्या कार्योत्तर नफ्यात २८.०७ टक्के वाढ नोंदवली आहे. वर्षभरात अनेक आव्हानांचा सामना करत कार्योत्तर नफा ३२४.७० कोटींवरून ४१५. ८४ कोटींवर पोहोचला. ३१ मार्च २०२० रोजी एकूण ठेवी
७,०२८ कोटी रुपये होत्या व त्यामध्ये २८.०४ टक्क्यांची वाढ झाली असून ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी एकूण ठेवी ८,९९९ कोटी रुपये होत्या. एकूण कासा ९६० कोटींमध्ये मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ८१.९९ टक्क्यांची वाढ होऊन ही रक्‍कम १,७४८ कोटी रुपये इतकी झाली आहे. ठेवींमधील कासाचे प्रमाणही ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या वर्षाच्या १३.५५ टक्‍क्‍यांवरून ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी १९.४२ टक्के इतका लक्षणीय सुधारला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: