देश-विदेश

फेसबुक, सोशल मीडियावर उद्यापासून भारतात बंदी?

नवी दिल्ली :
देशातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांच्यावर सरकारकडून निर्बंध घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २५ फेब्रुवारीला न्यूज वेबसाईट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म तसेच सोशल मीडिया कंपन्यांना तीन महिन्यात नव्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्या संस्थेत बदल करण्यास सांगितले होते. आज शेवटची तारीख आहे. पण नव्या नियमांबाबत कंपन्यांकडून अद्याप सरकारला प्रतिसाद मिळालेला नाही. असे असताना आता केंद्र सरकार या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांवर कोणतीही कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, फेसबुक नियमांचे पालन करेल की नाही याविषयी कंपनीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आमचे ध्येय आयटी नियमांच्या तरतुदींचे पालन करणे आहे. त्याचबरोबर सरकारशी अधिकच्या गुंतवणूकीसंदर्भात गरज असलेल्या काही मुद्द्यांवर चर्चा करणे सुरू आहे. आयटी नियमांच्या अनुषंगाने आम्ही कार्यक्षमता सुधारण्याचे कार्य करीत आहोत. आमच्या व्यासपीठावर स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे व्यक्त होण्याच्या लोकांच्या क्षमतेबद्दल फेसबुक वचनबद्ध आहे.’

भारत सरकारने देशात काम करत असलेल्या सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधीही देण्यात आला होता. हा कालावधी २५ मे म्हणजेच उद्या संपत आहे. मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीने या नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे. परिणामी २५ मे नंतर भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडिया साइट्स बंद होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

आतापर्यंत आयटी ॲक्ट चे कमल ७९ अन्वये सोशल मीडिया कंपन्यांना इंटरमीडियरीच्या नात्याने लाइबिलिटीमधून सूट मिळत होती. मात्र, भारतीय राज्यघटना आणि कायद्यांकडे दुर्लक्ष करून बऱ्याच कंपन्या सामग्रीवर निर्णय घेत आहेत. नवे नियम २६ मे २०२१ पासून लागू होत आहेत. जर या कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, तर त्यांचे इंटरमीडिअरी स्टेटस काढून घेतले जाऊ शकते. त्या भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार, गुन्हेगारी कारवाईच्या चौकटीत येऊ शकतात.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: