कला-साहित्यगोवा 

प्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन

पणजी :
गोव्यातील पहिले युवा सतारवादक, रेडिओ कलाकार योगीराज नाईक बोरकर (५३) यांचे गुरुवार, दि. २९ एप्रिल रोजी निधन झाले. राजन मिश्रा यांच्या पाठोपाठ योगीराज यांच्या रूपाने संगीत क्षेत्राला बसलेला हा दुसरा धक्का आहे.
कोरोना झाल्यानंतर योगीराज यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच सामाजिक, सांस्कृतिक व संगीत क्षेत्रातील शेकडो गोमंतकीयांना मोठा धक्का बसला.
तीन वर्षांपूर्वी आकाशवाणीवरून त्यांची मुंबईत बदली झाली होती. शुक्रवारी त्यांचा मृतदेह पर्वरी येथे नेण्यात येईल. यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हार्दोळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
yogiraj

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: