गोवा 

‘हि तर सरकारने केलेली एक प्रकारची हत्याच’

मडगाव :
न्यायालयाकडुन जामीन अर्ज मिळण्याच्या आदेशाची वाट पाहत असतानाच वयाच्या ८४ व्या वर्षी फादर स्टेन स्वामी यांना मरण आले. असंवेदनशील व बेजबाबदार भारत सरकारने आदिवासींच्या कल्याणासाठी आपले जीवन दिलेल्या एका सज्जन व दयाळू व्यक्तीची  हत्त्याच केली असे म्हणावे लागेल.

मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या फादर स्टेन स्वामी यांना जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी चालू असताना मरण आले हे अत्यंत दुर्देवी आहे. त्यांचे कुटूंबिय व हितचींतक तसेच अनुयायांच्या प्रती मी सहवेदना व्यक्त करतो.

आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले. त्यांना न्याय व दया मिळणे गरजेचे होते. भारत देशाच्या या महान नागरिकास माझा सलाम.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: