गोवा देश-विदेश

‘… म्हणूनच केली अमित शाह यांनी मुख्यमंत्री- आरोग्यमंत्र्यामध्ये मध्यस्थी’

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आरोप 

पणजी :
भारतीय जनता पक्षाला लोकांचे होणारे हाल व कष्टांचे काहिच पडलेले नसुन, केवळ  लोकांच्या आजाराचा बाजार करण्याचे त्यांचे धोरण परत एकदा समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांच्या कपाटात असलेल्या राफेल घोटाळ्यातील फाईल्सचा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे भांडाफोड करतील या भितीनेच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यामधिल अंदाजे रु.२२ कोटी ५९ लाख रुपयांच्या आयव्हरमेक्टिन गोळ्यांच्या खरेदीवरील कमिशन वाटणीत मध्यस्थी केली असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

आज गोव्यात ऑक्सिजन अभावी लोकांचे प्राण जात असताना त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजप नेतृत्वाला वेळ नाही. गृह मंत्री अमित शहानी  गोव्यात संपुर्ण लॉकडाऊन करा अशी लोकांची मागणी ऐकली नाही. गोव्यात आज लसींचा तुटवडा आहे त्यावर बोलायला अमित  शहांना वेळ नाही. कोविड लसीकरणासाठी केंद्राकडुन सहाय्य देण्याबद्दल अमित शहा काहीच बोलत नाहीत. परंतु , मोदी सरकारचे बिंग फुटेल या भितीने राफेल फाईल्सचा आरोग्यमंत्री भांडाफोड करतील या भितीने   डॉ. प्रमोद  सावंत व विश्वजीत राणे यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यास केंद्रीय गृहमंत्री पुढे आले असे गिरीश चोडणकर म्हणाले.

गोव्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्राण गेलेले मृ्त्त व त्यांचे नातेवाईक यांच्याप्रती केंद्रीय गृह मंत्री एक शब्द बोलले नाहीत हे दुर्देवी आहे. गोमंतकीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यास ते विसरले.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडुन गोव्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांवर कारवाईची कोणतीच अपेक्षा नाही. भाजपचे मोदी-शहा यांनीच हाताला रक्त लावुन सत्ता काबीज केली होती हे सर्वांनाच माहित आहे. त्या दोघांनाही मृत्युंबद्दल काहीच भावना नाहीत.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडुन शिकणे गरजेचे आहे. गोव्यात ऑक्सिजनच्या अभावामुळे मरण आलेल्यांप्रती राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले व त्यांच्या कुटूंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. त्यापुढे जावुन कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणुन सर्वांनी राष्ट्रहिताचा विचार करुन प्रयत्न करावेत असे आवाहन केले. कॉंग्रेस पक्षाची ही संस्कृती आहे असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

amit shah
विश्वजित राणे, प्रमोद सावंत

भाजप सरकारने गोव्यात कोविड आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन आयव्हेरमेक्टिन गोळ्या लोकांना देण्याचा निर्णय कोणाच्या सल्ला घेवुन आरोग्यमंत्र्यानी घेतला हे विश्वजीत राणे यांनी स्पष्ट करावे अशी मी परत एकदा मागणी करतो. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री हा माहिती द्यायला का घाबरतात? सदर गोळ्या विकत घेण्यासाठी निवीदा जारी केली होती का व सदर कंत्राट कोणत्या कंपनीला देण्यात आले हे हिम्मत असेल तर भाजप सरकारने जाहिर करावे अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

जागतीक आरोग्य संघटनेने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचे सेवन केवळ आरोग्य चाचणीनंतरच करावे असे परत एकदा स्पष्ट केले आहे. भाजप सरकारने “आजाराचा बाजार” करण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवीले आहे. भाजप सरकारकडे लोकांना मोफत लस देण्यास निधी नाही. परंतु, कोणताही वैज्ञानीक आधार नसताना तसेच वैद्यकीय तज्ञाचा सल्ला न घेता केवळ कमिशन खाण्याच्या उद्देशाने हे सरकार कोविड प्रतिबंधात्मक उपायाच्या नावाने आयव्हरमेक्टिन गोळ्या खरेदी करते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या संगनमताने आरोग्यमंत्र्यांनी केलेला हा घोटाळा आहे, असेही चोडणकर यांनी यावेळी नमूद केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: